spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

पोलीस स्टेशन कळमेश्वर हद्दीत सट्टापट्टी चालविणाऱ्या आरोपीविरूद्ध गुन्हा नोंद

कळमेश्वर :- कळमेश्वर पोलीसांना गुप्त बातमीदारा मार्फत खात्रीशीर माहीती मिळाली की, मौजा गौडखैरी येथे काही इसम लोकांकडून पैसे घेवुन सट्टाप‌ट्टीचे आकडे लावुन हारजीतचा जुगार खेळत आहे. मिळालेल्या माहीतीच्या आधारे पोलीस घटनास्थळी पोहचत असतांना पोलीसांची चाहुल लागताच लागताच तेथील आरोपी पळुन गेले. सदर मुख्य आरोपी चे नाव सलीम ईकबाल कुरैशी, वय ३० वर्ष, रा गौडखैरी तह. कळमेश्वर असल्याची माहीती पोलीसांना प्राप्त झाली. पोलीसांनी घटनास्थळीची पंचासमक्ष पाहणी करून घटनास्थळावरून १) नगदी ३३७०/-रूपये २) हिरो स्प्लेंडर एम एच ४० वि एम ५३६७ किंमती ३०,०००/- रूपये ३) होंडा पॅशन एम एच ४० होड ८५२२ किंमती २०,०००/- रूपये ४) सट्टापट्टी साहीत्य आणि इतर साहित्य असा एकुण ५३,९८०/- रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

नमुद आरोपी कं १) सलीम ईकबाल कुरैशी, वय ३० वर्ष, रा गौडखैरी तह. कळमेश्वर आणि त्याचे साथीदार यांच्या विरूद्ध कलम १२ (अ) महाराष्ट्र जुगार अधिनियम अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.