उमरेड :- उमरेड पोलीसांना गुप्त बातमीदारांकडुन खात्रीशीर माहीती मिळाली की, मौजा बोरगाव कलांद्री शिवार येथे काही इसम कोंबडयाची झुंज लावून पैशांचा हारजितचा जुगार खेळत आहे. मिळालेल्या माहीतीच्या आधारे उमरेड पोलीस घटनास्थळी पोहचले असता, काही इसम कोबडयांच्या पायाला धारदार काती बांधुन त्यांच्या झुंज लावुन पैशांचा हारजितचा खेळ खेळतांना दिसुन आले. पोलीसांनी आरोपी क. १) हरिदास किसन शेंडे, वय ४० वर्ष, रा. वडेगाव उमरेड, २) उमेश गोमा करुटकर, वय ४० वर्ष, रा. बेलसाखरा उमरेड ३) संदिप बापुराव हुलके, वय ४० वर्ष, रा. बेलसाखरा उमरेड ४) रामाजी साधु मेश्राम, वय ६० वर्ष, रा मोहपा उमरेड ५) संदिप आनंदराव पवार, वय २५ वर्ष, रा. सेलु जि. वर्धा ६) संदिप महादेव वरठी, वय ३६ वर्ष, रा. बेलसाखरा उमरेड ७) कन्हैया रामराव जाधव, वय ३८ वर्ष, रा. बेलसाखरा उमरेड ८) लखन जीवन जाधव, वय ३४ वर्ष, रा. मसाळा उमरेड ९) किसन बापुराव बचाले, वय ४८ वर्ष, रा. वेलयाखरा, उमरेड १०) दिलीप जीवन जाधव, वय ३१ वर्ष, रा. मसाळा उमरेड यांना जागीच पकडले, पोलीसांनी घटनास्थळावरून चार दुचाकी वाहने, रोख रक्कम २६००/- रूपये तसेच डावावर नगदी ११६०/- रुपये, ०३ कोंबडे, ०२ काती असा एकुण २,२२,२६०/- रूपयांचा मुद्देमाल पंचासमक्ष जप्त केला आहे. आरोपी नामे क्र. १) ते १०) यांच्याविरूद्ध पोलीस स्टेशन उमरेड येथे कलम १२ (व) महाराष्ट्र जुगार कायदया अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.








