पारशिवणी :- पारशिवणी पोलीस पेट्रोलींग करीत असतांना गुप्त बातमीदारद्वारे माहिती मिळाली की, मुकेश दिलीपजी गजभिये, रा. इंदिरा नगर, बोरबन, पारशिवनी याने त्यांच्या पानठेल्या मध्ये महाराष्ट्रात प्रतिबंध असलेला सुंगधीत तंबाखु, पानमसाला मिश्रीत सुपारीचे पावडर विकी करीता साठा करून ठेवले आहे. मिळालेल्या माहीतीच्या आधारे पोलीसांनी मौजा इंदिरा नगर, बोरबन, पारशिवनी येथे जावुन पंचासमक्ष आरोपीच्या पानठेल्याची झडती घेतली असता महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असलेला सुंगधीत तंबाखु आणि पानमसाला मिळुन आला. पोलीसांनी पंचासमक्ष एकुण ८.२३४ किलो प्रतिबंधीत पान मसाला व सुंगधीत तंबाखु किंमती ९,६०५/- रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
नमुद आरोपीविरूद्ध पोस्टे पारशिवणी येथे भारतीय न्याय संहीता २०२३ चे कलम १२३, २७४, २७५, २२३ सह कलम अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम अन्वये गुन्हा नोंद केला आहे. आरोपी नामे मुकेश दिलीपजी गजभिये, वय. ३३ वर्ष, रा. इंदिरा नगर, बोरबन, पेंचरोड, ता. पारशिवनी जि. नागपुर याला अटक करण्यात आली.




