Home Latest News इंन्स्टाग्राम अकाउंटवर तरुणीला मानसिक त्रास दिल्याप्रकरणी तरुणांवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

इंन्स्टाग्राम अकाउंटवर तरुणीला मानसिक त्रास दिल्याप्रकरणी तरुणांवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

0
22

पांढरकवडा :- सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा गैरवापर करून अल्पवयीन मुलीचा सातत्याने पाठलाग करत तिला प्रेमाचे संदेश पाठवून मानसिक त्रास दिल्याप्रकरणी पांढरकवडा पोलिसांनी एका २१ वर्षीय तरुणाविरूद्ध पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे, जय प्रभाकर भुरे (व्य २१, रा. सायखेडा, ता. केळापूर) असे आरोपीचे नाव आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १४ वर्षीय पीडित मुलगी पांढरकवडा येथे संगणक कोर्ससाठी ये -जा करते. गेल्या दोन महिन्यांपासून आरोपी जय भुरे हा मुलीच्या इच्छेविरुद्ध तिच्या इंन्स्टाग्राम खात्यावर वारंवार संदेश पाठवत होता. या प्रकारामुळे मुलीला मानसिक त्रास सहन करावा लागत होता. मुलीने याबाबत कुटुंबीयांना माहिती दिल्यानंतर त्यांनी आरोपीची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याच्या वर्तनात कोणताही बदल झाला नाही. दरम्यान, १६ जून रोजी सायंकाळी आरोपीने पुन्हा इन्स्टाग्रामवर अनेक संदेश पाठवत संवाद साधण्याचा दबाव टाकला. तसेच फोन करून बोलण्याचा प्रयत्न केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. सततच्या त्रासाला कंटाळून पीडितेच्या वड़िलांनी पांढरकवडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली, या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी जय भुरे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ७९ तसेच पोक्सो कायदा कलम १२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन रघुपती करीत आहेत.