Home Latest News इंन्स्टाग्राम अकाउंटवर तरुणीला मानसिक त्रास दिल्याप्रकरणी तरुणांवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

इंन्स्टाग्राम अकाउंटवर तरुणीला मानसिक त्रास दिल्याप्रकरणी तरुणांवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

0

<p><strong>पांढरकवडा &colon;-<&sol;strong> सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा गैरवापर करून अल्पवयीन मुलीचा सातत्याने पाठलाग करत तिला प्रेमाचे संदेश पाठवून मानसिक त्रास दिल्याप्रकरणी पांढरकवडा पोलिसांनी एका २१ वर्षीय तरुणाविरूद्ध पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे&comma; जय प्रभाकर भुरे &lpar;व्य २१&comma; रा&period; सायखेडा&comma; ता&period; केळापूर&rpar; असे आरोपीचे नाव आहे&period;पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार&comma; १४ वर्षीय पीडित मुलगी पांढरकवडा येथे संगणक कोर्ससाठी ये -जा करते&period; गेल्या दोन महिन्यांपासून आरोपी जय भुरे हा मुलीच्या इच्छेविरुद्ध तिच्या इंन्स्टाग्राम खात्यावर वारंवार संदेश पाठवत होता&period; या प्रकारामुळे मुलीला मानसिक त्रास सहन करावा लागत होता&period; मुलीने याबाबत कुटुंबीयांना माहिती दिल्यानंतर त्यांनी आरोपीची समजूत काढण्याचा प्रयत्न केला&period; मात्र&comma; त्याच्या वर्तनात कोणताही बदल झाला नाही&period; दरम्यान&comma; १६ जून रोजी सायंकाळी आरोपीने पुन्हा इन्स्टाग्रामवर अनेक संदेश पाठवत संवाद साधण्याचा दबाव टाकला&period; तसेच फोन करून बोलण्याचा प्रयत्न केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे&period; सततच्या त्रासाला कंटाळून पीडितेच्या वड़िलांनी पांढरकवडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली&comma; या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी जय भुरे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता &lpar;बीएनएस&rpar; कलम ७९ तसेच पोक्सो कायदा कलम १२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे&period; या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन रघुपती करीत आहेत&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version