Home Latest News मित्रांतील वादात मध्यस्थी करणाऱ्या मजुरावर चाकूने हल्ला; आरोपी गजाआड

मित्रांतील वादात मध्यस्थी करणाऱ्या मजुरावर चाकूने हल्ला; आरोपी गजाआड

0

<p><strong>कामठी &colon;-<&sol;strong> मित्रांमधील वाद मिटविण्यासाठी मध्यस्थी करणाऱ्या एका मजुरावर चाकूने हल्ला करून जखमी केल्याची घटना जुनी कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जे&period;पी&period; नगर येथे घडली&period; या प्रकरणी जुनी कामठी पोलिसांनी आरोपीला अटक करून त्याच्याकडून लोखंडी पत्र्याचा चाकू जप्त केला आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार&comma; मनोज सूर्यप्रकाश गोरे &lpar;वय 43&comma; रा&period; बापूचा बगीचा&comma; अजनी रोड&comma; कामठी&rpar; हे दि&period; 16 जून रोजी रात्री सुमारे 11 वाजता त्यांच्या एका मित्रासह आरोपी तरुण अशोक मेश्राम &lpar;वय 26&comma; रा&period; जे&period;पी&period; नगर&comma; कामठी&rpar; याच्या घरी गेले होते&period;<&sol;p>&NewLine;<p>यावेळी आरोपीने फिर्यादीच्या मित्राला&comma; &&num;8220&semi;मी कामावर असताना तू माझ्या घरी का येतो&quest;&&num;8221&semi; असा जाब विचारत वाद घालण्यास सुरुवात केली&period; हा वाद शांत करण्यासाठी मनोज गोरे यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला&period; मात्र&comma; संतप्त झालेल्या आरोपीने त्यांना धक्का देऊन खाली पाडले आणि स्वतःजवळील चाकूने वार करून जखमी केले&period;<&sol;p>&NewLine;<p>या घटनेप्रकरणी मनोज गोरे यांच्या तक्रारीवरून जुनी कामठी पोलीस ठाण्यात अप&period; क्र&period; 363&sol;2026 अन्वये भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 109&comma; 115&lpar;2&rpar;&comma; 351&lpar;3&rpar; तसेच महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम 135 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>जुनी कामठी पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी तरुण अशोक मेश्राम याला दि&period; 17 जून रोजी सकाळी 6&period;31 वाजता अटक केली असून पुढील तपास सुरू आहे&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version