Home Latest News कामठी तालुक्यात मोठ्या प्रमाणात अंधश्रद्धेचे जाळे; भोंदूबाबांच्या दुकानदारीला टाळे कोण लावणार?

कामठी तालुक्यात मोठ्या प्रमाणात अंधश्रद्धेचे जाळे; भोंदूबाबांच्या दुकानदारीला टाळे कोण लावणार?

0

<p><strong>संदीप कांबळे&comma; कामठी &colon;-<&sol;strong> कामठी शहर व तालुक्यात अंधश्रद्धेचे जाळे दिवसेंदिवस वाढत असून भोंदूबाबांच्या बुवाबाजीला पुन्हा एकदा उधाण आले आहे&period; यामुळे अनेक नागरिक फसवणूक&comma; आर्थिक लूट आणि मानसिक शोषणाचे बळी ठरत असल्याने जागरूक नागरिकांनी प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>कामठी शहरात गोरगरीब&comma; दलित&comma; बिडी मजूर&comma; विणकर तसेच विविध धर्मीय आणि जातीजमातींचे नागरिक वास्तव्यास आहेत&period; शहरासह ग्रामीण भागात मांजर आडवे जाणे&comma; भूतबाधा&comma; करणी&comma; अंगारे-धुपारे&comma; गंडेदोरे&comma; पायाळू व्यक्तीला गुप्तधन दिसते&comma; साप चावल्यानंतर वैद्यकीय उपचाराऐवजी मंत्रिकांकडे जाणे यांसारख्या अंधश्रद्धांवर अनेकजण आजही विश्वास ठेवत असल्याचे दिसून येत आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>कामठी शहरातील अनेक झोपडपट्ट्या व काही भागांमध्ये भोंदूबाबांनी आपली दुकानदारी थाटली असून भूतप्रेत उतरविणे&comma; घरातील संकट दूर करणे&comma; मूलबाळ होण्यासाठी उपाय सांगणे&comma; रक्कम दुप्पट करून देणे&comma; सट्ट्याचे नंबर काढणे&comma; गुप्तधन शोधून देणे&comma; मुलींना वश करणे यांसारख्या आमिषांद्वारे नागरिकांची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप होत आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>काही वर्षांपूर्वी रक्कम दुप्पट करण्याच्या आमिषाने कामठीतील एका दाम्पत्याची हत्या झाल्याची आणि एका महिलेच्या बेपत्ता होण्याची घटना घडली होती&period; या घटनांमुळे शहरात मोठी खळबळ उडाली होती&period; त्यानंतर अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीने भोंदूबाबांना चमत्कार सिद्ध करण्याचे खुले आव्हान देत जनजागृती केली होती&period; त्या काळात अनेक भोंदूबाबांचे बिंग फुटले आणि त्यांची दुकानदारी काही प्रमाणात बंद पडली होती&period;<&sol;p>&NewLine;<p>मात्र&comma; सध्या पुन्हा एकदा शहर आणि ग्रामीण भागात ढोंगी बाबांचे प्रस्थ वाढताना दिसत असून अंधश्रद्धा निर्मूलनासाठी व्यापक जनजागृती&comma; कायदेशीर कारवाई आणि प्रशासनाच्या प्रभावी हस्तक्षेपाची गरज निर्माण झाली आहे&period; त्यामुळे&comma; &&num;8220&semi;कामठीतील भोंदूबाबांच्या दुकानदारीला टाळे कोण लावणार&quest;&&num;8221&semi; असा सवाल जागरूक नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version