spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

चाचेर येथे लोकसहभागातून श्रमदान करून सांड नदीवर बांधला बंधारा

किशोर साहू, मौदा :- शुक्रवार (ता.27 फेब्रुवारी) ला ग्रामपंचायत कार्यालय चाचेर येथे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा 2 अंतर्गत लोकसहभागातून श्रमदान या विषयावर कार्यक्रम घेण्यात आला. सदर कार्यक्रमाच्या अंतर्गत चाचेर येथील रहिवासी मारुती बरबटे यांच्या शेताजवळील सांड नदीवर यशस्वीरीत्या बंधारा बांधण्यात आला. बंधारा बांधल्याने नदीतील पाणी अडविण्यात आलेला आहे. या बंधाऱ्यामुळे पाण्याची पातळी जास्त खोलवर जाणार नाही तसेच परिसरातील शेतकऱ्यांना या पाण्याचा लाभ होणार आहे.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी लुंबिनी महेश कलारे सरपंचा , शैलेश कोपरकर ग्राम पंचायत सदस्य तथा काँग्रेस पक्षाचे जि प चे भावी उमेदवार, कल्पना बिसने, कृषी पाटील तालुका कृषी अधिकारी, गोंदेवार मंडळ कृषी अधिकारी, ठेंगणे उप कृषी अधिकारी,जयश्री गभणे नैसर्गिक साधनसंपत्ती व्यवस्थापन समन्वयक, खडूळ सहाय्यक कृषी अधिकारी , वैशाली ठुबे , केंडे ,पायल झलके सह सर्व समूह सहाय्यक यांचे मोलाचे सहकार्य लाभले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.