spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

पवनी येथे आदिवासी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा व समाज प्रबोधनाचा कार्यक्रम रविवारला 

किशोर साहू, मौदा :- आदिवासी गोवारी (गोंड – गोवारी)फाउंडेशन (रामटेक – मौदा – पारशिवनी समाज संघटना) देवलापार संघटन ,रामटेक तर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही समाजातील इयत्ता दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळा व समाज प्रबोधनाचा कार्यक्रम रामटेक तालुक्यातील पवनी येथील हिवरा बाजार रोड स्थित अपलोना गोंटूल आदिवासी सभागृहात रविवार (ता. 21 जून)लाआयोजित केला आहे.

या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी नोंदणी करिता संपर्क करण्याचे आव्हान संघटनेचे अध्यक्ष भास्कर राऊत, उपाध्यक्ष मनोहर सोनवाणे, कोषाध्यक्ष सतीश गाडे, सचिव कृष्णा सहारे, सदस्यगण जीवन राऊत ,उमेश राऊत, आनंद सहारे, जगदीश शेंद्रे, ब्रह्मानंद नेवारे, सुरेश शेंद्रे, लक्ष्मी राऊत, बाळू सोनवणे, केशव नेवारे प्रभाकर नेवारे यांनी केले आहे.

Popular Articles