किशोर साहू, मौदा :- उद्या बुधवार (ता.22 जुलै) रोजी सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत लाईफ लाईन ब्लड बँक भंडारा यांच्या सहकार्याने कोदामेंढी येथील गर्देश्वरी मंदिर परिसरात भाजपा मौदा तालुका व मौदा शहर यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाचे उद्घाटन महसूलमंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे करणार असून कार्यक्रमाला माजी आमदार टेकचंद सावरकर, भाजपा अध्यक्ष नागपूर ग्रामीण आनंदराव राऊत , भाजपा महामंत्री नागपूर ग्रामीण अनिल निधान, प्रदेश कार्यकारणी सदस्य अशोक हटवार, मौदा नगरपंचायत नगराध्यक्ष प्रसन्ना (राजा) तिडके ,माजी भाजपा तालुका अध्यक्ष मुकेश अग्रवाल, संजय गांधी निराधार योजना समिती तालुकाध्यक्ष रामेश्वर लिचडे, तालुका समन्वय समिती सदस्य नरेश बावनकुळे ,ग्रामपंचायत कोदामेंढी उपसरपंच गोपाल गिरमेकर उपस्थित राहणार आहे.
रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असल्याने ,आपल्या एका रक्तदानामुळे अनेक गरजू रुग्णांना नवजीवन मिळू शकते .समाजाप्रती आपले कर्तव्य पार पाडत सर्व नागरिक युवक – युती ,महिला तसेच भारतीय जनता पक्षाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या पवित्र सामाजिक उपक्रमात मोठ्या संख्येने उपस्थित राहून रक्तदान करून मानवसेवेच्या या पुण्यकार्याला हातभार लावावा, असे आव्हान भाजपा मौदा तालुकाध्यक्ष भगवान बावनकुळे, भाजपा मौदा शहराध्यक्ष मोरेश्वर सोरते , तालुका समन्वय समिती अध्यक्ष तथा भाजपा मौदा तालुका प्रभारी नरेश मोटधरे यांनी केले आहे.




