spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा मार्फत मुख्यमंत्री जन आरोग्य शिबिराचे आयोजन

हंसराज भंडारा :-  जिल्हा रुग्णालय भंडारा, मुख्यमंत्री सहाय्य्ता निधी व धर्मदाय रुग्णालय मदत कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने संपूर्ण भंडारा जिल्ह्यात दिनांक 21 जुलै ते 30 जुलै 2026 या कालावधीत जन आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये केंद्र शासन तसेच राज्य शासन पुरस्कृत विविध आरोग्य विषयक योजनांबाबत व्यापक जनजागृती, जन प्रबोधन तसेच चिकित्सा सेवा आदींचा समावेश आहे.

त्यानुसार 21 जुलै 2026 रोजी ग्रामीण रुग्णालय पवनी व ग्रामीण रुग्णालय लाखांदूर. 22 जुलैला ग्रामीण रुग्णालय पालांदूर, 23 जुलै रोजी ग्रामीण रुग्णालय मोहाडी, 24 जुलैला ग्रामीण रुग्णालय अड्याळ, 25 जुलै रोजी ग्रामीण रुग्णालय सिहोरा, 27 जुलैला उपजिल्हा रुग्णालय साकोली, 28 जुलै रोजी ग्रामीण रुग्णालय लाखनी व 30 जुलै 2026 रोजी उपजिल्हा रुग्णालय तुमसर येथे मुख्यमंत्री जन आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

सदर शिबिरामध्ये सर्व नागरिकांसाठी विविध आरोग्य सेवा उपलबध करुन देण्यात येणार आहेत. यामध्ये रक्तदान शिबीर, स्तनकर्करोग तपासणी, गर्भाशय व मुख कर्करोग तपासणी, नेत्र तपासणी व आवश्यक शस्त्रक्रिया यांचा समावेश आहे.

तरी भंडारा जिल्ह्यातील नागरिकांनी रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी मोठ्या संख्येने या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संदिपकुमार गजभिये यांनी केले आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.