spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

भव्य तिरंगा रॅलीने जरीपटका परिसर दुमदुमला

– फाळणी भयावहता स्मृती दिन कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

नागपूर :-  फाळणी भयावहता स्मृती दिनानिमित्त जरीपटका येथील जिंजर मॉलपासून आज (ता. 14) भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली. या रॅलीचे नेतृत्व नगरसेवक विक्की कुकरेजा यांनी केले. रॅलीचा समारोप माजी महापौर दयाशंकर तिवारी यांच्या उपस्थितीमध्ये वसंत शाह चौकात झाला. देशभक्तीच्या घोषणांनी परिसर दुमदुमला होता. यात मोठ्या प्रमाणावर नागरिक सामील झाले होते.

यावेळी , दुर्बल घटक समितीच्या सभापती लक्ष्मी हत्तीठेले, नगरसेविका प्रमिला मथरानी, नगरसेविका  निरंजना पाटील, नगरसेविका सुषमा चौधरी, नगरसेवक  शेषराव गोतमारे, नगरसेवक संजय चावरे, माजी आमदार डॉ. मिलिंद माने, माजी उपमहापौर संदीप जाधव उत्तर नागपूर भाजपचे प्रमुख संजय चौधरी, जितेंद्र ठाकूर,  गणेश कानतोडे, अमित पांडे, उपायुक्त अशोक गराटे, क्रीडा अधिकारी डॉ. पियूष अंबुलकर उपस्थित होते.

या रॅलीत जवळपास 300 मीटर लांब तिरंगा ध्वज या रॅलीचे विशेष आकर्षण होते. तिरंगे की आन रहे, भारत की शान रहे अशा घोषणा देत तरुण, तरुणी नागरिकांनी या रॅलीत उत्स्फूर्तपणे भाग घेतला.

यावेळी बोलताना नगरसेवक विक्की कुकरेजा यांनी फाळणीच्या दुःखाचे कथन केले. पाकिस्तानमधून आलेल्या सिंधी बांधवांना या कटू प्रसंगाला सामोरे जावे लागले. याच फाळणीग्र्सत परिवाराचा मी सदस्य असल्याचे त्यांनी सांगितले.

या रॅलीचा समारोप करताना माजी महापौर दयाशंकर तिवारी म्हणाले, 1857 मध्ये झालेल्या स्वातंत्र्य युद्धात हिंदू व मुसलमान एकत्रितपणे इंग्रजांचा सामना केला. परंतु हिंदू-मुस्लिम एकत्रित राहिले तर राज्य करणे कठीण जाईल, हे लक्षात आल्यानंतर इंग्रज सरकारने फूट टाका व राज्य करा हे धोरण अंमलात आणले. यामुळे देशाची फाळणी झाली. फाळणीचे हे दुःख पचवून सिंधी बांधवांनी या देशाच्या विकासात मोठे योगदान दिल्याचा आवर्जुन उल्लेख दयाशंकर तिवारी यांनी केला. व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचा सत्कार उपायुक्त अशोक गराटे यांनी मनपाचा मानाचा दुपट्टा देऊन केला.

Popular Articles