spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

चाचेर येथे 15 ऑगस्ट निमित्त अंगणवाडीतील 5 शाखेतील सर्वच बालकांना गणवेश, शूज, टाय, नॅपकिन सरपंच लुंबिनी कलारे यांच्या हस्ते वाटप, बालकांच्या चेहऱ्यावर आनंद

किशोर साहू, मौदा :- स्वातंत्र्याचा 79 वा अमृत महोत्सव चाचेर येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने ग्रामपंचायत चाचेरच्या वतीने गावातील अंगणवाडी क्र. 1, 2, 3, 4, 5 मधील सर्व लहान बालक-बालिकांना शैक्षणिक साहित्य वाटपाचा उपक्रम राबविण्यात आला.ग्रामपंचायतच्या 15 व्या वित्त आयोग निधीतून हा उपक्रम राबविण्यात आला. सरपंच लुंबिनी महेश कलारे यांच्या हस्ते व ग्रामविकास अधिकारी वसंता बावणे,ग्रामपंचायत सदस्य, अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या उपस्थितीत वाटप करण्यात आले.

यावेळी मुलांसाठी शर्ट-पॅन्ट, मुलींसाठी फ्रॉक,सर्व बालकांना नवीन बूट,शालेय गणवेशासोबत टॉय, स्वच्छतेच्या दृष्टीने नॅपकिन (रुमाल) वाटप करण्यात आले. साहित्य मिळाल्यानंतर बालकांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होते.

यावेळी बोलताना सरपंच लुंबिनी कलारे म्हणाल्या, “स्वातंत्र्य दिन हा केवळ ध्वजवंदनाचा दिवस नसून, आपल्या गावच्या भवितव्याला घडवण्याचा दिवस आहे. अंगणवाडीतील आमची चिमुकली मुले उद्याचे नागरिक आहेत. त्यांना चांगले शिक्षण, आरोग्य आणि सन्मान मिळाला पाहिजे. म्हणून ग्रामपंचायतीने हा छोटासा प्रयत्न केला आहे. यापुढेही बालकांच्या विकासासाठी ग्रामपंचायत नेहमीच कटिबद्ध राहील.”

याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्यगण शैलेश कोपरकर,प्रकाश वाक्कलपूडी,सुरेंद्र टेम्भरे,योगेश निनावे, चंद्रकला धोटे, सुमन सोमकुवर, सविता जांभरे, नलू दरवई,रोशनी किरपाण,ममता चौरे, अंगणवाडी पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका, मदतनीस व मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंगणवाडी सेविकांनी केले.

गणवेश व शूज मिळाल्याने लहान मुलांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला. पालकांनी देखील ग्रामपंचायतीच्या या उपक्रमाचे कौतुक केले.

Popular Articles