– पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग
कन्हान :- भारतीय जनता युवा मोर्चा, नागपुर ग्रामीण (रामटेक जिल्हा) च्या वतीने कन्हान शहरात भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. टेकाडी फाटा येथील राम मंदिरापासुन देशभक्तीच्या संगीतमय वातावरणात सुरु झालेली ही रॅली जुना पोलीस स्टेशन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक आणि तारसा फाटा मार्गे कन्हान येथील भाजपा कार्यालय ‘दिवटे भवन’ येथे पोहोचुन उत्साहात संपन्न झाली.
या तिरंगा रॅलीचे मुख्य आयोजक म्हणुन भाजपा युवा मोर्चा (नागपुर ग्रामीण – रामटेक जिल्हा) चे चेतन खडसे, भाजयुमो जिल्हा महामंत्री मनोज गिरी , जिल्हा उपाध्यक्ष उमेश कुंभलकर आणि कन्हान मंडळ युवा मोर्चा अध्यक्ष आशिष दिवटे यांनी धुरा सांभाळली. याप्रसंगी भाजपचे नागपुर जिल्हा अध्यक्ष आनंद राऊत आणि रामटेकचे माजी आमदार डी. मल्लिकाअर्जुन रेड्डी, माजी जि. प. सदस्य वेंकटेश कारमोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच जिल्हा महामंत्री रिंकेश चवरे, अजय बोढारे, राहुल किरपान, नागपुर जिल्हा उपाध्यक्ष सुनंदा दिवटे, संजय मुलमुले, कन्हान नगरपरिषदेचे अध्यक्ष राजेंद्र शेंदरे, कांद्री नगरपंचायत अध्यक्ष सुजित पानतावणे, मनोज कुरडकर, अतुल हजारे, कन्हान मंडळ अध्यक्ष बिरेंद्र सिंग, जितेंद्र बावनकुळे, शिवशंकर वाकुडकर, प्रशांत पाटील व कन्हान मंडळ उपाध्यक्ष लाखेश्वर वासाडे यांची विशेष उपस्थिती लाभली. या रॅलीत कन्हान नगरपरिषद, रामटेक नगरपरिषद आणि कांद्री नगर पंचायतीचे सर्व सन्माननीय नगरसेवक, अमोल साकोरे , कैलास खंडार, मयुर माटे, हर्ष पाटील, दिनेश राऊत, राजेश पोटभर, शुभम यादव, शिव गोपाल यादव आदी प्रमुख कार्यकर्ते व पक्षाचे विविध स्तरावरील पदाधिका री आणि भाजयुमोचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने हातात तिरंगा घेऊन सहभागी झाले होते. संपुर्ण मार्गावर ‘भारत माता की जय’ च्या घोषणांमुळे परिसर देश भक्तीच्या रंगात रंगुन गेला होता.








