spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

निर्मल नगरीच्या मंदिरात भक्तांची प्रचंड गर्दी, जणू काही शेगावच अवतरले !

– निर्मल नगरीच्या मंदिरात चौथ्या वर्षी आंब्याचा रस, सरगुंडे व शेवळ्या महाप्रसादात !

– पुरुषोत्तम मास महाप्रसाद महापरायणाचे आयोजन संपन्न

नागपूर :- श्री संत गजानन महाराज सेवा ट्रस्ट च्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या ३५ वे, सामूहिक महापारायणाप्रसंगी उमरेड मार्गावरील निर्मल नगरीच्या मंदिरात, श्री गजानन विजय ग्रंथाचे महापारायण रविवारी 24 मे 2026 रोजी, अतिशय सुंदर, आनंदात पार पडले. रविवारच्या सकाळी ६ ते ११ या दरम्यान, १ ते २० व्या, अध्यायाचे पठण, त्यानंतर ११ः३० वा. २१ व्या, अध्यायाचे सामूहिक पठण व आरती, नंतर दुपारी १२ वाजतापासून महाप्रसादाला प्रारंभ झाला. निर्मल नगरीच्या मंदिरात सकाळ पासूनच भक्तांनी प्रचंड गर्दी केली होती. मंदिरात शिस्तीप्रमाणे नियमांचे पालन करून त्याप्रसंगी महाप्रसादाची किमयाच झाली ! बघा कशी.. प्रत्येक भक्तांच्या थालीमध्ये आंब्याचा रस, शेवड्या, सरगुंडे, पोळ्या, भजे, वांग्याची भाजी, झुनका-भाकरी आणि मसाला भात हे महाप्रसादात देण्यात आले. आणि भक्तांनी आनंदाने आस्वाद घेतला.

श्री गजानन महाराजांची किमया बघा, किती सुंदर जेवण मिळालं, भक्तांचे मन प्रसन्न झाले ! यामध्येच तर खरं भक्तांचे प्रेम दिसून आले. उलट असं वाटतं होत की, आपण शेगाव सारखेच जेवण केले. याप्रसंगी नागपूरातील 46 ते 47 डीग्री सेल्सिअस तापमाना दरम्यान मंदिरात चपचप घामाने भिजलेल्या भक्तगणांनी प्रचंड गर्दी केली होती. जणू काही शेगावच अवतरले असे यावेळेस दिसून आले. मंदिरात गजानन महाराजांचा जयजयकार, गण गण गणात बोते या मंत्राचा गजर ही गजर होता. यावेळी हजारोच्या संख्येने भक्तांनी महाप्रसादाचा अप्रतिम आस्वाद घेतला. या सर्वांच्या मागे आयोजकांनी अथक परिश्रम घेतलेत. कारण यांच्या प्रयत्नामुळे भक्तगण एकत्रित आलेले आहे. आणि महाप्रसादात आंब्याचा रस मिळाला हे विशेष


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.