spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

अंगणवाडी कर्मचारी (सीटु) संघटनेचा 13 डिसेंबर रोजी विशाल मोर्चा विधानभवनावर धडकणार

नागपूर :- अनेक प्रलंबित मागण्यांना घेऊन अंगणवाडी कर्मचारी संघटना सीटु च्यावतीने 13 डिसेंबर रोजी, विधान सभेवर विशाल मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. तेव्हा या मोर्चात अंगणवाडी सेविका व मदतनीस भगीनींनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन शुभा शमिम, संगीता कांबळे, आरमायटी इराणी, चंदा मेंढे, राधा सुकुरवार, विठ्ठल जुनघरे, रमेशचंद्र दहीवडे, पंजाबराव गायकवाड, भैय्या देशकर, रमेश सोनुले, अरूण भेलके, मनीषा इसलकर, शशी काळे, प्रिती पराते, मनीषा बेले, चंदा मारिया,शारदा बरेहा, रजनी सूर्यवंशी, पुष्पा सवाईथुल, लता साठवणे, प्रतिभा पाटील यांनी केले आहे.

हा मोर्चा दिनांक 13 डिसेबर रोजी दुपारी 12 वाजता. बालभवन शुक्रवारी तलाव उद्यान येथुन विधान भवनासमोर जाणार आहे. या मोर्च्याच्या मागण्या खालील प्रमाणे आहेत. मानधनात वाढ करता अनेक अटी, शर्ती लावुन प्रोत्साहन भत्ता नाव देऊन तो देण्यात पाचर मारली आहे. तेव्हा प्रोत्साहन भत्ता हे नांव रद्द करून सरसकट 5000/- रू. व 3000/- रू. मानधनात वाढ करण्यात यावी, ग्रॅज्युएटी व पेन्शन लागु करा, बी.एल.ओ.च्या कामातुन मुक्त करा, पोषण ट्रैकर, एफ.आर.एस., मातृवंदना आदी ऑनलाइन मधील तांत्रिक दोष दुर करा व त्याचे आधी प्रशिक्षण द्या,थकीत प्रवास भत्ता, अंगणवाड्यांचे थकीत घरभाडे तातडीने अदा करा,10-20-30 वर्षे सेवा झालेल्या मदतनीस व सेविकांना प्रकल्प स्तरावर 3, 4, व 5 % मानधन वाढ देण्याची व्यवस्था करा, कोविड काळातील दिवाळी व उन्हाळी सुट्याचे मानधन तातडीने अदा करा.

Popular Articles