– शेतकरी, वराडा व घाटरोहणा सरपंच यांनी वनविभागाला केली नुकसान भरपाईची मागणी.
कन्हान :- तालुक्यातील वराडा गाव येथे शेतकरी वसंता बोढारे यांच्या शेतातील गोठ्यात बाधलेल्या गो-याची बिबट्याने रात्री शिकार करून जिवानिशी ठार मारल्याने वन विभागाने पिडीत शेतक-यास नुकसान भरपाई देण्याची केले.
बुधवार (दि.२९) ऑक्टोंबर ला शेतकरी वसंता बोढारे यांनी पाळीव प्राण्यांच्या देखभालीसाठी शेतात गोठा बांधला असुन सायंकाळी जनावरांना नियमित प्रमाणे गोठ्यात बांधुन घरी गेले. गुरूवार (दि.३०) आक्टोबर दुसऱ्या दिवशी सकाळी पाळीव जनावरांची देखभाल करण्यासाठी गेले असता कोठयात बाधलेला २ वर्षाचा गोरा कोठयात दिसुन आला नाही. त्याचा शोधाशोध घेतला असता गोठ्यापासुन काही अंतरावर नाल्याजवळ गोरा अर्धवट बिबट्याने खाल्याचे निदर्श नात आले. याची माहिती पिढीत शेतकरी वसंता बोढारे यांनी वराडा सरपंच सुनिल जामदार व घाटरोह णा सरपंच किशोर बेहुणे यांना दिली असता. त्यांनी पारशिवनी वनविभागातील वनरक्षक यांना घटनेची माहिती दिला असता वनविभाग पटगोवारी क्षेत्र सहायक, वनरक्षक व पिआरटी टिम सह घटनास्थळी पोहचुन घटना स्थळाची पाहणी करून पंचनामा कर ण्यात आला. यात बिबटयाने शेतकरी वसंता बोढारे यांच्या गो-याची शिकार करून ठार मारल्याने पिडित शेतक-याचे जवळपास ३०,०००/- रुपयाचे नुकसान झाले असल्याने पिडीत शेतकऱ्यास वन विभागाने तात्काळ नुकसान भरपाई दयावी. तसेच बिबट्याच्या हल्लात गो-याचा मृत्यु झाल्याने वराडा व पटगोवारी परिसराच्या जवळपास गावात वन्यप्राणी व विबट्याची दहशत निर्माण झाल्याने वन विभागाने बिबट्याला पकडुन दुर घनदाट वनामध्ये सोडुन बिबटयाचा योग्य बंदोबस्त करावा अशी मागणी क्षेत्र सहायक एस एम वासनिक यांचे कडे वराडा गावचे सरपंच सुनिल जामदार व घाटरोहणा सरपंच किशोर बेहुणे यांनी केली.
वराडा, घाटरोहणा, एंसबा सह पटगोवारी परिसरातील शेतक-यानी वन्य प्राण्यापासुन सावध गिरी बाळगण्याचे आवाहन क्षेत्र सहायक एस एम वासनिक हयानी केले आहे.




