spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

निष्ठावंत कार्यकर्त्याची पारख, कार्यकर्त्याची कर्तव्यनिष्ठ, जिल्ह्यातील ५५० नगरसेवकांमधून आष्टनकर यांची मतमोजणी प्रतिनिधी निवड, कर्तव्यदक्षता पाडली पार

खापा, वार्ताहर :- खापा नगर परिषदेचे नगरसेवक तथा सावनेर विधानसभेतील सर्वात तरुण नगरसेवक निखिल आष्ट्णकर यांची विधानपरिषद निवडणुकीत आमदार डॉ. राजीव पोतदार यांचे मतमोजणी प्रतिनिधी (टॅब्युलर एजंट) म्हणून नियुक्ती करण्यात आली.

निखिल आष्ट्णकर हे भाजपचे जुने व निष्ठावंत कार्यकर्ते असून ते डॉ. पोतदार यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात. राजकीय अनुभव, सक्रिय कार्यशैली आणि तरुण नेतृत्वामुळे त्यांनी आपल्या कार्याची वेगळी छाप निर्माण केली आहे.

सुमारे ५५० नगरसेवकांमधून त्यांची निवड मतमोजणी प्रतिनिधी म्हणून करण्यात आली. ही जबाबदारी अत्यंत महत्त्वाची आणि विश्वासाची मानली जाते. डॉ. पोतदार यांनी त्यांच्यावर दाखविलेला विश्वास त्यांनी यशस्वीपणे सार्थ ठरवला.

मतमोजणीदरम्यान डॉ. पोतदार यांना मिळालेली मते, काँग्रेस उमेदवाराला मिळालेली मते तसेच अपात्र मतांवर त्यांनी बारकाईने लक्ष ठेवले आणि अचूक माहिती बाहेर दिली.

एकूण मतदान : ८२३

• डॉ. राजीव पोतदार भाजप उमेदवार– ६८२ मते

• अतुल लोंढे काँग्रेस उमेदवार – १३० मते

• अपात्र मते – ११

विश्वास, निष्ठा आणि कर्तव्यदक्षता यांच्या जोरावर निखिल आष्ट्णकर यांनी दिलेली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. ही नियुक्ती त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील एक महत्त्वाचा टप्पा ठरली आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.