खापरखेडा ०७ : संत गाडगेबाबा बहुउद्देशीय शिक्षण संस्था व सामाजिक न्याय विभागाच्या संयुक्त विद्यमाने व बसपाच्या पुढाकाराने आज खापरखेडा येथील साहिल सभागृहात 23 जोडप्यांचा बौद्ध पद्धतीने सामूहिक विवाह सोहळा पार पडला. या विवाहाचे वैशिष्ट्य असे की यात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ईतर मागासवर्गीय व धार्मिक अल्पसंख्यांक अशा बहुजन समाजातील विविध जाती व विविध धर्माच्या वर-वधुनी बौद्ध पद्धतीने विवाहाला अनुमती दिली. त्यामुळे धम्ममित्र जगदीश शेंडे यांनी बौद्ध पद्धतीने हा सामूहिक विवाह पार पाडला.
या ऐतिहासिक विवाह सोहळ्याला प्रामुख्याने बहुजन समाज पार्टीचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी पुढाकार घेतला होता. यावेळी महाराष्ट्र प्रदेश बसपाचे मीडियाचे प्रभारी उत्तम शेवडे, जिल्हा प्रभारी राजकुमार बोरकर, जिल्हाध्यक्ष लांजेवार, जिल्हा महासचिव चंद्रशेखर कांबळे, जिल्हा कोषाध्यक्ष उमेश मेश्राम पाहुणे व मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. यांच्या हस्ते विवाह नोंदणी प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली.
यांचा विवाह पार पडला
अनिकेत हेमराज जामगडे व पूजा पृथ्वीराज शेंडे, दीपक बारसुजी भोयर व शितल खुशाल घरडे, देविदास सिताराम रडके व पिंकीबाई खेलसिंग सतनामी, रोहित सुनील सालवणकर व पुनम राजकुमार रंगारी, रितेश शेखर मेनन व प्रीती उज्वल बोरकर, सुरज कैलास खोब्रागडे व समीक्षा शरद ढोके, पंकज नागोराव राऊत व काजल संदेश जारोंडे, हेमराज माधवराव लडके व अनुराधा मनसुजी टेकाम, आकाश राहुल लांडगे व जुही राजेंद्र बागडे, मुकुल सुदराज बारमाटे व अंजली मधु भोसले, उमेशकुमार विजयपाल वर्मा व अंजू देशराज वर्मा, शाहिद सत्तार शेख व प्रिया गणेश सरोदे, सोमेश उज्वल बोरकर व आरती ज्ञानेश्वर गायकवाड, अमरदीप वासुदेव गजभिये व दर्शना दशरथ वासनिक, अमित चिंतामण डोईजड व काजल सुंदरलाल चंदनबरवे, समर्थन फिरोज चिंचखेडे व आचल नंदकिशोर नानवटकर, सुमित धनीलाल मेश्राम व आरती दशरथ घरडे, बबन रामाजी पाटील व रिया यादोवराव बावणे, स्वप्निल सूर्यभान हाडके व हेमा सुनील कुंभारे, संदेश रामभाऊ कुर्वे व नंदिनी ज्ञानदेव भगत, प्रज्वल कमलेश जनबंधू व पायल छोटू कोल्हेटकर, मयूर राजू भिवगडे व लक्ष्मी श्रीराम पोहनकर, हर्षल दिलीप इंदोरकर व हर्षा हरीश ऊके ह्या बौद्ध, ख्रिश्चन, मुस्लिम, आदिवासी व हिंदू धर्मातील वर वधूंचा समावेश होता.
कार्यक्रमाचे आयोजक विजय कुमार डहाट, तसेच बसपा सावनेर विधानसभे च्या ताराबाई गौरखेडे, चंद्रगुप्त रंगारी, सुनील बारमाटे, रंजना घरडे, रामभाऊ कुर्वे, साधना काटकर, बबन वासनिक सुधाकर खांडेकर अरविंद ढोरे उत्तम गजभिये विजय ढोणे व त्यांच्या अनेक सहकार्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले. याप्रसंगी मोठ्या प्रमाणात परिसरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाला हजेरी लावली होती. कार्यक्रम भव्य असला तरी सामाजिक न्याय विभागाची उदासीनता मात्र दिसून आली. उपस्थित असलेल्या 23 जोडप्या सहित त्यांच्यासोबत आलेल्या सर्व आप्त मित्रांनी सहभोजनाचा आनंद घेतला.




