Home Latest News घोटमुंढरी येथील जिल्हा परिषद शाळेत विकासाची नवीन पायरी!

घोटमुंढरी येथील जिल्हा परिषद शाळेत विकासाची नवीन पायरी!

0
9

– महसूलमंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंजूर केलेल्या 16.45 लक्ष रुपयांच्या शालेय संरक्षण भिंतीचे भूमिपूजन थाटात

किशोर साहू, मौदा :- महसूलमंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या माध्यमातून ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा’ योजनेंतर्गत , डीपीसी 2025-26 योजनेंतर्गत खात – रेवराल जिल्हा परिषद क्षेत्रातील गट ग्रामपंचायत घोटमुंढरी अंतर्गत येत असलेल्या घोटमुंढरी येथील जिल्हा परिषद शाळेच्या शालेय संरक्षण भिंत बांधकामासाठी 16.45 लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

या महत्त्वपूर्ण विकास कामाचे भूमिपूजन माजी जिल्हा परिषद सदस्य राधा मुकेश अग्रवाल यांच्या हस्ते नुकतेच उत्साहात संपन्न झाले.

याप्रसंगी माजी पंचायत समिती सभापती स्वप्निल श्रावणकर , सरपंचा चंदा गेडाम, सचिव हरीश धार्मिक,ग्राम पंचायत सदस्य विलास पटले, अरविंद भोयर, मौसमी घरडे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष उदय पांडे, मुख्याध्यापक विकास धारगावे,शिक्षकवृंद, ग्रामस्थ तसेच शाळा परिसरातील नागरिक व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भूमिपूजन सोहळ्यानंतर शाळेतील अत्याधुनिक एआय व व्हिआर लॅबची पाहणी करण्यात आली. विद्यार्थ्यांसाठी सुरू असलेल्या या आधुनिक शिक्षणाचे दर्शन घेत, शाळेच्या अडीअडचणी व समस्यांबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी चर्चा करून त्या लवकरात लवकर निकाली काढण्याच्या दृष्टीने आवश्यक सूचना देण्यात आल्या.

विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी आमचे प्रयत्न सदैव कटिबद्ध आहेत, असे मत याप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्या राधा मुकेश अग्रवाल यांनी व्यक्त केले.