– शेकडो साधकांनी सहभाग घेऊन घेतला धम्मलाभ
कामठी :- श्रावण पौर्णिमेनिमित्त शुक्रवार दिनांक 28 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 9.30 ते सायंकाळी 4.30 पर्यंत एकदिवशीय ध्यान शिबिराचे आयोजन ड्रॅगन पॅलेस विपश्यना मेडिटेशन सेंटर येथे करण्यात आले होते. या शिबिरामध्ये शेकडो साधकांनी सहभाग घेऊन धम्मलाभ घेतला.
शिबिराच्या सुरुवातीला उपस्थित विपस्वी साधकांना सहाय्यक आचार्य द्वारे शील देण्यात आले. त्यानंतर आनापान व विपश्यना साधना करण्यात आली. विपश्यनाचार्य गोयंका गुरुजी यांच्या ऑडिओ व्हिजन प्रवचनाने सायंकाळ ४:३० वाजता शिबिराचे समारोप करण्यात आले. या शिबिराचे संचालन सहाय्यक आचार्य श्री देशमुख यांनी केले.
ड्रॅगन पॅलेस परिसरात असलेल्या ड्रॅगन पॅलेस विपश्यना मेडिटेशन सेंटर येथे नियमित दहा दिवसीय, तीन दिवशीय, व दर पौर्णिमा ला एक दिवसीय ध्यान शिबिराचे नियमित आयोजन करण्यात येत असते. दहा दिवसीय, तीन दिवसीय, ध्यान शिबिरामध्ये सहभागी होणाऱ्या साधकांना ऑनलाइन पद्धतीनेwww.dragonpalacetemple.org या वेबसाईटने नोंदणी करणे आवश्यक आहे अशी माहिती ड्रॅगन पॅलेस च्या प्रमुख ऍड. सुलेखा कुंभारे यांनी पत्रकाद्वारे दिली.





