– “महाराष्ट्र उद्योग रत्न पुरस्कार 2026” ने सन्मानित झाले आनंद चंद्रिकापुरे
यासीन शेख,अर्जुनी-मोर :- हा केवळ एका व्यक्तीचा सन्मान नसून उद्योग, रोजगार, सामाजिक उत्तरदायित्व आणि विकासाच्या ध्येयाने झटणाऱ्या प्रत्येक कर्तृत्ववान हाताचा गौरव आहे. आज महाराष्ट्राला प्रगतीच्या नव्या शिखरावर नेण्यासाठी ज्या ध्येयवेड्या व्यक्तिमत्त्वांनी संघर्ष, परिश्रम आणि दूरदृष्टीच्या बळावर नवे मापदंड निर्माण केले, त्यामध्ये आनंद चंद्रिकापुरे यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते.
उद्योग क्षेत्रातील त्यांचे योगदान हे केवळ आर्थिक विकासापुरते मर्यादित नसून समाजातील सर्वसामान्य घटकांच्या सक्षमीकरणाशी जोडलेले आहे. रोजगार निर्मिती, सामाजिक बांधिलकी आणि विकासाभिमुख विचारांच्या माध्यमातून त्यांनी उभा केलेला आदर्श हा अनेकांसाठी प्रेरणास्थान आहे.
आजचा हा सन्मान महाराष्ट्राच्या विकासाच्या वाटचालीतील एक महत्त्वाचा टप्पा आहे. कर्तृत्व, नेतृत्व आणि समाजनिष्ठेच्या जोरावर मिळवलेला हा पुरस्कार त्यांच्या उज्ज्वल कार्याचा जिवंत पुरावा आहे.
आनंद चंद्रिकापुरे यांना “महाराष्ट्र उद्योग रत्न पुरस्कार 2026” प्राप्त झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन त्यांच्या पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा!
कर्तृत्वाला सलाम… संघर्षाला प्रणाम…आणि यशाला मानाचा मुजरा



