spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

नवेगाव बांधात रंगणार समाजप्रबोधनाचा जागर !

– गणेशोत्सवानिमित्त मा. युवराज मानकर यांचे जाहीर कीर्तन; गोवर्धन चौक आखर मोहल्ल्यात रविवारी भक्ती-प्रबोधनाची मेजवानी

पंकज परशुरामकर, प्रतिनिधी नवेगाव बांध :- गणेशोत्सवाच्या भक्तिमय वातावरणाला समाजप्रबोधनाची जोड देत सार्व बाल गणेश उत्सव मंडळ, गोवर्धन चौक आखर मोहल्ला, नवेगाव बांध यांच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त विशेष जाहीर कीर्तन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, दिनांक २० सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ८ वाजता गोवर्धन चौक आखर मोहल्ला येथे हा कार्यक्रम होणार असून, सत्यपाल महाराज यांचे शिष्य सप्तऋषीजी यादवक यांचे शिष्य मा. युवराज मानकर यांच्या प्रभावी कीर्तनातून उपस्थितांना भक्ती, अध्यात्म आणि समाजप्रबोधनाचा संदेश मिळणार आहे. गणेशोत्सवाच्या काळात केवळ मनोरंजनात्मक कार्यक्रम न घेता समाजाला दिशा देणारे आणि नागरिकांमध्ये सकारात्मक विचार रुजविणारे उपक्रम राबविण्याच्या उद्देशाने मंडळाने या जाहीर कीर्तनाचे आयोजन केले आहे. महाराष्ट्राच्या संतपरंपरेत कीर्तनाला केवळ धार्मिक कार्यक्रमाचे स्वरूप नसून, भक्तीच्या माध्यमातून सामाजिक जागृती, संस्कार, नैतिक मूल्ये आणि समाजहिताचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे प्रभावी माध्यम म्हणून महत्त्व आहे. याच परंपरेचा जागर गणेशोत्सवाच्या निमित्ताने नवेगाव बांध येथे करण्यात येणार आहे. मा. युवराज मानकर यांच्या ओघवत्या आणि प्रभावी शैलीतील कीर्तनातून उपस्थितांना आध्यात्मिक विचारांसोबतच सामाजिक जीवनातील विविध पैलूंवर मार्गदर्शन मिळणार असल्याने या कार्यक्रमाची नागरिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. गणेशोत्सव हा श्रद्धा, भक्ती आणि सामाजिक एकतेचा उत्सव असून, सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांना एकत्र आणण्याचे कार्य केले जाते. त्याच भावनेतून गोवर्धन चौक आखर मोहल्ल्यातील सर्व बाल गणेश उत्सव मंडळाने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. विशेषतः युवक आणि बालगणेश मंडळाच्या माध्यमातून आयोजित होणाऱ्या अशा प्रबोधनात्मक कार्यक्रमामुळे नव्या पिढीपर्यंत संस्कार, सामाजिक जबाबदारी आणि सकारात्मक विचार पोहोचण्यास हातभार लागतो. गणेशोत्सवाच्या उत्साहात भक्तीमय वातावरणात होणारे हे जाहीर कीर्तन परिसरातील नागरिकांसाठी आध्यात्मिक आणि सामाजिक विचारांची पर्वणी ठरणार आहे. कार्यक्रमासाठी मंडळाच्या पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सदस्यांकडून तयारी सुरू असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कीर्तनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सार्व बाल गणेश उत्सव मंडळ, गोवर्धन चौक आखर मोहल्ला, नवेगाव बांध यांच्या वतीने करण्यात आले आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.