spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

नागपुर ग्रामीण जिल्हयात जागतीक मानवी तस्करी दिनानिमित्य करण्यात आले विशेष कार्यशाळेचे आयोजन

 

नागपुर ३१ : दिनांक ३०/०७/२०२५ रोजी जागतीक मानवी तस्करी दिनानिमित्य नागपुर ग्रामीण जिल्हयाअंतर्गत पोलीस भवन येथे जिल्हयातील सर्व २२ पोलीस स्टेशनला कार्यरत पोलीस काका आणि पोलीस दिदी चे काम करणारे पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांच्या साठी विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यशाळेला अनैतिक मानवी तस्करी प्रतिबंध विभाग, भरोसा सेल चे अधिकारी आणि अंमलदार सुध्दा हजर होते. मानवी तस्करीसारख्या व्यापक गुन्ह्याला आळा घालणे, मानवी तस्करी या गंभीर मुद्द्यांवर जनसामान्यामध्ये जावुन जनजागृती करणे यासाठी पोलीस स्टेशन स्तारावर काम करणारे अधिकारी आणि अंमलदार यांना प्रशिक्षण देण्यात आले. सदर प्रशिक्षण हे नागपुर ग्रामीण जिल्हा पोलीस जिल्हा महीला व बाल विकास अधिकारी, नागपुर, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, नागपुर, बालकल्याण समिती, नागपुर आणि मुक्ती ट्रस्ट नागपुर यांनी संयुक्तीक रित्या घेतले. सदर कार्यक्रमात १)  सुरेखा बोरकुटे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, नागपुर २)  वसीम शेख, होप फाउंडेशन फॉर चिड्रेन, पुणे, ३)  छाया राउत, अध्यक्षा, बालकल्याण समिती, नागपुर, ४)  मुस्ताक पठाण, जिल्हा महीला व बाल विकास अधिकारी, ५) सहा. पोलीस निरीक्षक,  माधुरी गायकवाड, प्रभारी अधिकारी, भरोसा सेल, नागपुर ग्रामीण यांनी प्रशिक्षणाकामी हजर पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांना मार्गदर्शन केले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.