– बनपुरी सह परिसरातील गावकऱ्यां मध्ये दहशतीचे वातावरण
कन्हान :- पारशिवनी तालुक्यातील बनपुरी गावातील शेत शिवारात बाधुन असलेली गाभण गिरगाय जाती ची गायीची वाघाने शिकार करून नाल्यात नेऊन तिला ठार केल्याने बनपुरी, तेलंगखेडी व साटक परिसरात गावकऱ्यांमध्ये वाघाची दहशतीचे वातावरण निमार्ण झाले आहे.
वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या बनपुरी गावच्या शेत शिवारात शेतमालक धनराज गड़ी मेंघरे हे गाभण गिरगाय जातीच्या गायी ला बुधवारी सायंकाळी बांधुन घरी आले व गुरुवारी सकाळी ७ वाजता शेत मालक गायीचा चारापानी करिता शेतात गेल्यावर गाभण गाय दिसली नाही. तेव्हा शेतात फिरून नाल्याजवळ पाहिले तर त्याची गाभन गिरगाय गाय मृत अवस्थित दिसली असता धनराज मेंघरे यानी सरंपच नंदलाल बाबनकुळे व उपसरपंच रुपेश ढोबळे, पोलिस पाटील याना माहिती दिल्याने त्यांनी क्षेत्र सहायक एस एम वानसिक याना घटनेची माहिती दिली. काही वेळाने वनरक्षक धर्मपाल डोंगरे, गार्ड एस एस नागरगुचे सह पिआरटी टिम घटनास्थळी पोहचुन घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा करित साटक चे पशुवैद्यकिय अधिकारी डॉ. संतोष तुपट याना बोलवुन पोस्टमार्टम केले. आणि तसा अहवाल तयार करून माहिती वरिष्ठाना पाठविला.

बनपुरी शेत शिवार परिसरात वाघ व बिबट्याचा वावर वाढल्याने जवळपासच्या गाव परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. या संबंधी वन परिक्षेत्राचे वन रक्षक धर्मपाल डोंगरे व क्षेत्र सहाय्यक अधिकारी एस एम वासनिक आणि पीआरटी टीम यांनी सकाळी ९.३० वाजता गावात आल्यावर बनपुरी गावाचे सरपंच नंदलाल बाबनकुळे, उपसरपंच रुपेश ढोबळे व पोलिस पाटील आणि गावकरी शेतकऱ्यांनी पिढीत शेतकरी धनराज गड़ी मेंघरे यांची गाभण गिरगाय जातीची गाय वाघाने शिकार करून ठार केल्याने अंदाजे ६५ ते ७० हजार रूपयाचे नुकसान झाले आहे. ही नुकसान भर पाई शासनाने त्वरित पिडीत शेतक-यास देण्याची तसे च बनपुरी तेलनखेडी व साटक परिसरात असलेल्या वाघ व बिबटयास वन विभागाने तात्काळ पकडुन दुर घनदाट जंगलात नेऊन सोडण्याची मागणी केली आहे.




