नागपूर :- नागपूर महानगरपालिकातर्फे देशाचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांना जयंती दिनानिमित्त आज (ता.२५) विनम्र अभिवादन करण्यात आले.
मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या हस्ते मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीच्या दालनातील भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून विनम्र अभिवादन केले.

याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत, वैष्णवी बी. प्रामुख्याने उपस्थित होत्या. यावेळी उपायुक्त डॉ. रंजना लाडे, मेघना वासनकर, राजेश भगत, मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले, मनपाच्या जनसंपर्क विभागाचे अमोल तपासे, प्रमोद हिवसे, शैलेश जांभुळकर यांच्या सह इतर अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.








