spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

अल्युमिनीयम तार चोरीचे एकुण १३ गुन्हे उघड

– ४ आरोपी अटक १४ लाख ५८ हजारांचा मुद्देमाल जप्त

उमरेड :- फिर्यादी नामे मिलींद दिगांबर वालदे, वय ३६ वर्ष, व्यवसाय अभीयंता, पॉलीकॅब कंपनी, रा. आंबेकर ले आउट, उमरेड यांनी तकार दिली की, पॉलीकॅब कपंनीला महावितरण कंपनी तर्फे नागपूर जिल्ह्यात विजेचे खांब लावण्याचे काम मिळाल्याने उमरेड सब स्टेशन अंतर्गत ठाणा ते नावेगाव साधु, तिरखुरा ते कन्हांडला, येथील खांबेवरील तार लावण्याचे काम सुरु असुन त्यापैकी काही ठिकाणी लाईन सुरु असुन काही लाईन बंद आहे. दिनांक २३/०१/२०२६ रोजी ११/०० वा. फिर्यादी यांनी पाहणी केली असता त्यांना ठाणा ते नवेगाव साधु येथील चालु ईलेक्ट्रीक लाईनचे २.९ कि.मी. लांब अल्युमिनिअम तार किंमती १०,००० रुपये तसेच तिरखुरा ते कन्हांडला येथील बंद लाईनचे ३.३ कि.मी. लांब अल्युमिनिअम तार किंमती १५,०००/- रुपये असा एकुण ६.२ कि.मी. लांबीचा अल्युमिनिअम तार एकुण किमती २५,०००/- रुपयांचा मुद्देमाल कोणीतरी अज्ञात चोराने कटरच्या सह्यायाने चोरून नेला आहे. सदर प्रकरणी पोलीस स्टेशन उमरेड येथे कलम ३०३ (२) भा.न्या.सं. अन्वये चोरीचा गुन्हा नोंद केला.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.