Home Latest News केळापूर जगदंबा संस्थानात लकी ड्रॉ द्वारे आरती निवड प्रक्रिया संपन्न

केळापूर जगदंबा संस्थानात लकी ड्रॉ द्वारे आरती निवड प्रक्रिया संपन्न

0
144

सुरज बंडीवार, पांढरकवडा :- लाखो भाविक‌ भक्तांचे श्रध्दास्थान असलेल्या केळापुरच्या श्री जगदंबेच्या नवरात्रोत्सवास २२ सप्टेंबर पासुन सुरुवात होत आहे. २२ सप्टेंबर ते २ ऑक्टोंबर पर्यंत साजऱ्या होणाऱ्या नवरात्रोत्सवानिमित्त केळापुर येथे दिनांक १८ सप्टेंबर रोजी संस्थानच्या विश्वस्त मंडळाच्या उपस्थितीत व चिमुकल्यांच्या हस्ते भाविकांसाठी लकी ड्रॉ द्वारे आरती निवड प्रक्रिया पार पडली. २२ सप्टेंबर रोजी घटस्थापनेची पहिली आरती संस्थानचे अध्यक्ष शंकर बडे यांच्या हस्ते तर संध्याकाळी आरती भोजाजी किराणा (वडकी) यांच्या हस्ते होणार आहे. २३ सप्टेंबर रोजी सकाळची आरती श्रेयांशी जगदिश रामेलावार (मिर्झापूर) यांच्या हस्ते तर संध्याकाळची आरती मिनल शशांक मुत्यालवार (पाटणबोरी) यांच्या हस्ते होणार आहे. २४ सप्टेंबर रोजी सकाळची आरती सुभाष बोरेले (पांढरकवडा) यांच्या हस्ते तर संध्याकाळची आरती रुपेश ओमप्रकाश डहाके (घाटंजी) यांच्या हस्ते होणार आहे. २५ सप्टेंबर रोजी सकाळची आरती जनार्दन चिकनकर (करंजी) यांच्या हस्ते तर संध्याकाळची आरती नम्रता अश्विन आरेवार (नागपूर) यांच्या हस्ते होणार आहे. २६ सप्टेंबर रोजी सकाळची आरती कुणाल येरावार (पांढरकवडा) यांच्या हस्ते तर संध्याकाळची आरती सौ. आरती पंकज भेंडाळे यांच्या हस्ते होणार आहे. २७ सप्टेंबर रोजी सकाळची आरती प्रविण नारायण कुळकर्णी (पांढरकवडा) यांच्या हस्ते तर संध्याकाळची आरती कु. अंशीका शंकर नक्कलवार (पाटणबोरी) यांच्या हस्ते होणार आहे. २८ सप्टेंबर रोजी सकाळची आरती सौ. मंगलाबाई बापु पारशिवे (केळापूर) यांच्या हस्ते तर संध्याकाळची आरती अश्विनी गौड बेला (तेलंगणा) यांच्या हस्ते होणार आहे. २९ सप्टेंबर रोजी सकाळची आरती मुकेश मालपाणी आदिलाबाद (तेलंगणा) यांच्या हस्ते तर संध्याकाळची आरती अनंत माधवराव वखरे (पांढरकवडा) यांच्या हस्ते होणार आहे. ३० सप्टेंबर रोजी सकाळची आरती आदिती गजानन गाउत्रे (पांढरकवडा) यांच्या हस्ते तर संध्याकाळची आरती सौ.आशा मारोती आरेवार (पांढरकवडा) यांच्या हस्ते होणार आहे तर १ ऑक्टोंबर रोजी सकाळची आरती मनोज मधुकरराव पुराणिक (घाटंजी) यांच्या हस्ते तर घट विसर्जनला संध्याकाळची आरती संस्थानचे अध्यक्ष शंकर बडे यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. आरती लकी ड्रॉ निवड प्रक्रियेत संस्थानचे उपाध्यक्ष काशिनाथ शिंदे, सचिव चंद्रशेखर पोलाडीवार, सहसचिव वामनराव सिडाम, कोषाध्यक्ष प्रेमराव वखरे, दिपक अण्णा कापर्तीवार यांच्यासह संस्थानचे कर्मचारी व भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.