spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

एबीव्हीपी तर्फे स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांची संयुक्तरित्या जयंती साजरी

किशोर साहू,मौदा ,ता. १३:- सोमवार ( दि. १२ जानेवारी) ला कोदामेंढी येथील राजेश्वरी रेड्डी ज्युनिअर स्कूल अँड कॉलेज येथे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) यांच्या वतीने युवा दिनाच्या निमित्ताने स्वामी विवेकानंद तसेच राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या प्रसंगी स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या प्रेरणादायी जीवनकार्यावर आधारित भाषणाद्वारे युवकांना आत्मविश्वास, चारित्र्यनिर्मिती व राष्ट्रनिर्मितीसाठी प्रेरित करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

या कार्यक्रमास रामटेक जिल्हा संयोजक आर्यन पुनम झाडे, नगर सहमंत्री प्रियांशु भगवान बावनकुळे, शाळेचे प्राचार्य रेड्डी, शिक्षकवृंद तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी व कार्यकर्ते उपस्थित होते.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.