spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

हिंदु देवी-देवतांविषयी आक्षेपार्ह व्हिडिओ प्रकरणात आरोपीला अटक

– भगवान शंकरांविषयी आक्षेपार्ह व्हिडियो व्हॉट्सअँप स्टेटस ठेवणे सलमान शेख ला भोवले

कन्हान :- हिंदु धर्मातील भगवान शंकर महादेव यांच्या विषयी आक्षेपार्ह व्हिडिओ आणि अशोभनीय विधाने असलेले व्हॉट्सअँप स्टेटस ठेवल्या प्रकरणी कन्हान पोलिसांनी तातडीने कारवाई करत कांद्री येथिल सलमान शेख याला अटक केली आहे. या प्रकरणी भारत माता सेवा संघटनेचे अध्यक्ष दीपक देवदास नेचवानी वय ४२ रा. सुगतनगर, नागपुर यांनी कन्हान पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली होती.

गुरुवार (दि.२) जुलै रोजी दुपारी ३ वाजता दरम्यान सुरज मिश्रा ने दिपक यांना फोन करुन सांगितले कि त्याच्या मोबाईलमध्ये ७७९८६७४७१७ हा क्रमांक ” गोंडेगाव टायर वाले ” या नावाने सेव्ह आहे. संबंधित व्यक्तीने आपल्या व्हॉट्सअँप स्टेट्स मध्ये हिंदु धर्मातील देवी-देवतांबाबत आक्षेपार्ह व्हिडिओ तसेच अशोभनीय विधाने असलेला व्हिडिओ ठेवला आहे. त्यानंतर सूरज मिश्रा यांनी तो व्हिडिओ दिपक यांचा व्हॉट्सअँप क्रमांक ९३५६२०८११३ वर पाठविला.

त्यानंतर शुक्रवार (दि.३) जुलै ला दुपारी ३ वाजता पोलीस ठाणे कन्हान जवळ सूरज मिश्रा यांनी त्यांच्या मोबाईलमध्ये संबंधित ‘गोंडेगाव टायर वाले” या व्हॉट्स अँप स्टेटसवरील व्हिडिओ मला प्रत्यक्ष दाखविला. त्या व्हिडिओमध्ये भगवान शंकर महादेव यांच्याबाबत आक्षेपार्ह दृश्ये व अशोभनीय विधाने असल्याचे दिपक यांना दिसुन आले. सदर व्हिडिओमुळे हिंदु समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्याने भारत माता सेवा संघटन आणि सकल हिंदु समाजच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस निरीक्षक वैजयंती मंडवधरे यांना निवेदन देऊन तात्काळ आरोपीला अटक करुन कायदेशीर कारवाई ची मागणी केली होती. निवेदनाची गंभीर दखल घेत कन्हान पोलिसांनी तपास करून आरोपी सलमान शेख रा. कांद्री ला अटक करुन कलम २९९ , १९६(१)(क), ३५३(१)(क) नुसार गुन्हा दाखल करुन पुढील तपास पोलीस निरीक्षक वैजयंती मंडवधरे यांचा मार्ग दर्शनात कन्हान पोलीस करित आहे. या कारवाईमुळे धार्मिक तेढ निर्माण करणारे किंवा कोणत्याही धर्माच्या श्रद्धास्थानांचा अवमान करणारे संदेश, व्हिडिओ अथ वा पोस्ट सोशल मीडियावर प्रसारित करणाऱ्यांवर कायद्याने कठोर कारवाई होऊ शकते, असा स्पष्ट संदेश पोलिसांच्या या कारवाईतुन गेला आहे.

Popular Articles