कन्हान :- पाटील नगर च्या मागे प्रभाग क्र. १७ कांद्री येथिल वच्छलागोपी पब्लिक स्कूल या शाळेत दोनशे पेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षण घेत असुन शाळेकडे जाणारा रस्ता कच्चा असुन तो कालव्याच्या (कॅनल) बाजुने असल्याने ये-जा करण्यास भयंकर त्रासदायक असल्यामुळे या रस्ताचे डाबरीकरण किंवा सिमेंटीकरण करण्याची मागणी शाळेने स्थानिय नागरिकांच्या वतीने मुख्याधिकारी नगरपंचायत कांद्री हयाना निवेदन देऊन करण्यात आली आहे.
कांद्री नगरपंचायत अंतर्गत पाटील नगर मागील प्रभाग क्र. १७ येथे लोकवस्ती असुन वच्छलागोपी पब्लिक स्कूल ही शाळा असुन या शाळेत दोनशे पेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहे. शाळेकडे जाणारा रस्ता कच्चा असुन तो कालव्याच्या (कॅनल) बाजुने असल्याने पावसाळ्यात हा रस्ता अतिशय खराब होतो , त्यामुळे विद्यार्थी, पालक व कर्मचारी आणि नागरिकां ना ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असुन भयंकर त्रास दायक असल्याने अनेक वेळा घसरून अपघात होण्याची शक्यता देखील निर्मा ण होते. करिता नागरिकांच्या, विद्यार्थ्यांच्या सुरक्षितते चा व सोयीचा विचार करून सदर रस्ता डांबरीकरण किंवा सिमेंटीकरण करून बनवुन देण्याची मागणी शाळेच्या समन्वयक बीना राजपाल सिंग हयानी नगर पंचायत मुख्याधिकारी सचिन गाढवे हयाना निवेदन देऊन केली आहे








