नागपूर, ०३ : मनपा अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत आणि अतिरिक्त आयुक्त वैष्णवी बी. यांनी बुधवारी (ता.२) कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी अर्थात सीएसआर निधी बाबत मनपाच्या विभाग प्रमुख आणि सीएसआर प्रतिनिधींची बैठक घेतली.
नागपूर महानगरपालिका मुख्यालयातील अतिरिक्त आयुक्त सभा कक्षात पार पडलेल्या बैठकीत समाज विकास विभागाच्या उपायुक्त डॉ. रंजना लाडे, घनकचरा व व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त राजेश भगत, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ.गजेंद्र महल्ले, कार्यकारी अभियंता राजेंद्र राठोड, कार्यकारी अभियंता रविंद्र बुंधाडे, उद्यान अधीक्षक अमोल चौरपगार, माहिती तंत्रज्ञान अधिकारी स्वप्नील लोखंडे, सहायक शिक्षणाधिकारी सुभाष उपासे, प्रामुख्याने उपस्थित होते.
बैठकीत अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत यांनी शिक्षण, आरोग्य, एसडीजी, महिला सक्षमीकरण इत्यादी क्षेत्रात सीएसआर निधीच्या माध्यमातून अधिक विकासात्मक कामे करता येईल, असे सांगत या क्षेत्रात सीएसआर निधीची खरी गरज असल्याचे सांगितले. तसेच नागपूर महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर सीएसआर बद्दलची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही दिल्या. सदर बैठकीमध्ये विनय बगले, विनय त्रिकोलवार, परिवहन विभागचे राजीव घाटोळे, केदार मिश्रा, पीएनयू सीएसआर महानगरपालिकेच्या प्रोग्राम मॅनेजर शास्वी ठाकूर, समन्वयक कोमल सोनी उपस्थित होते.





