spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

मनपाच्या अतिरिक्त आयुक्तांनी केली स्मार्ट शौचालयाची पाहणी

– जागतिक शौचालय दिनानिमित्त मनपातर्फे विशेष जनजागृती

नागपूर :- जागतिक शौचालय दिनानिमित्त नागपूर महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातर्फे विविध ठिकाणी जनजागृती करण्यात आली. यावेळी मनपाच्या अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत यांनी बुधवारी (ता.19) मनपातर्फे लक्ष्मीनगर झोन येथील प्रभाग 16 मधील वर्धा मार्गावरील दि.हितवाद कार्यालयाच्या समोर तयार करण्यात आलेल्या स्मार्ट टॉयलेट पाहणी केली. यावेळी मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. गजेन्द्र महल्ले, झोनल अधिकारी ऋषिकेश इंगळे, आयईसी चमू आणि सुलभ सॅनिटेशन मिशनचे अधिकारी उपस्थित होते.

मनपाच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातर्फे जागतिक शौचालय दिनाचे औचित्य साधून मनपाच्या लक्ष्मी नगर, हनुमान नगर आणि लकडगंज झोनमधील स्मार्ट टॉयलेट परिसरात नागरिकांना स्वच्छतेचे व जबाबदारीने शौचालयाचे उपयोग करावा, तसेच येलो स्पॉट फ्री बनविण्याच्या उद्देशाने जनजागृती उपक्रम राबविण्यात आला.

जनजागृती कार्यक्रमाच्या माध्यमातून नागरिकांना ‘स्वच्छ शौचालय-स्वस्थ शहर’ संदेश देत जागतिक शौचालय दिवस साजरा करण्यात आला. या जनजागृती कार्यक्रमात स्मार्ट टॉयलेटचे महत्व, स्वच्छता मानके, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी उपलब्ध सुविधा, उपयोगाबाबत नागरिकांना सविस्तर माहिती देण्यात आली. नागरिकांनी खुल्या ठिकाणी मुत्रविसर्जन करण्याऐवजी सार्वजनिक शौचालयाचा वापर करावा. आदी संदेश देण्यात आले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.