Home Latest News हसन मुश्रीफांनंतर अजितदादांच्या आणखी एका शिलेदाराने पालकमंत्रिपद सोडलं, कारणही समोर

हसन मुश्रीफांनंतर अजितदादांच्या आणखी एका शिलेदाराने पालकमंत्रिपद सोडलं, कारणही समोर

0

<p><strong>गोंदिया&colon; <&sol;strong>राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनी काही महिन्यांपूर्वी वाशिम जिल्ह्याचं पालकमंत्री सोडल्यानंतर आता आणखी एका मंत्र्याने पालकमंत्रिपदाच्या जबाबदारीतून मुक्त होण्याचा निर्णय घेतला आहे&period; राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी गोंदिया जिल्ह्याचं पालकमंत्रिपद सोडलं आहे&period; राष्ट्रवादी काँग्रेसचा काल वरळी इथं जिल्हाध्यक्षांची बैठक पार पडली&period; या बैठकीत पक्षाचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबतची माहिती दिली&period; पाटील यांनी पालकमंत्रिपद सोडल्यानंतर राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्यावर गोंदियाच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>बाबासाहेब पाटील हे पालकमंत्री झाल्यापासून जिल्ह्यात फारसे येत नसल्याची तक्रार गोंदियातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडूनच पक्षनेतृत्वाकडे केली जात होती&period; काही दिवसांपूर्वी विदर्भात झालेल्या राष्ट्रवादीच्या चिंतन शिबिरात पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांनीही जाहीरपणे या मुद्द्यावर भाष्य केलं होतं&period; या पार्श्वभूमीवर आता अखेर बाबासाहेब पाटील यांनी पालकमंत्रिपदाच्या जबाबदारीतून मुक्त होण्याचा निर्णय घेतला असून आता इंद्रनील नाईक हे गोंदियाचे नवे पालकमंत्री म्हणून काम पाहणार आहेत&period;<&sol;p>&NewLine;<p>source &colon; maharashtra times<&sol;p>&NewLine;

Exit mobile version