Home Latest News ज्या नेत्याला अमोल कोल्हेंनी फोडलं, त्याने वर्षभरातच हाती ‘कमळ’ घेतलं, शरद पवारांना...

ज्या नेत्याला अमोल कोल्हेंनी फोडलं, त्याने वर्षभरातच हाती ‘कमळ’ घेतलं, शरद पवारांना मोठा धक्का

0

<p><strong>पुणे &colon; <&sol;strong>स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी पुणे जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाने आपली ताकद वाढवायला सुरुवात केली आहे&period; पुणे शहरात भाजपने आधीच अनेक बडे नेते आपल्या पक्षात घ्यायला सुरुवात केली असताना आता पुणे ग्रामीणमध्ये सुद्धा भाजपने राष्ट्रवादीला टार्गेट केलं आहे&period; कधीकाळी राष्ट्रवादीचा गड असणारा पुणे जिल्हा आपल्या ताब्यात घेण्यासाठी भाजपने पावलं उचलायला सुरुवात केली आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>याच अनुषंगाने भाजपने जिल्हा परिषद निवडणूक डोळ्यासमोर ठेवत&comma; अमोल कोल्हे यांनी वर्षभरापूर्वी फोडलेल्या अजित पवारांच्या नेत्याला भाजप प्रवेश दिला आहे&period; आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघांमध्ये मोठं नाव असणारे शेखर पाचुंदकर यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आहे&period; गेल्या वर्षी एप्रिलमध्येच शेखर पाचुंदकर यांनी à¤…जित पवार यांच्या पक्षाला रामराम ठोकत अमोल कोल्हे यांच्या पुढाकाराने शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला होता&period; त्यावेळी शेखर पाचुंदकर यांना आंबेगाव तालुकाध्यक्ष पद सुद्धा बहाल करण्यात आलं होतं&period; मात्र आता वर्षभरातच पाचुंदकर यांनी तुतारीची साथ सोडत हाती कमळ घेतलं आहे&period; त्यामुळे जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर हा राष्ट्रवादीला मोठा धक्का मानला जात आहे&period; शेखर पाचुंदकर हे आंबेगाव विधानसभा मतदारसंघातील मोठं नाव आहे&period; à¤¶à¤¿à¤°à¥‚रच्या 42 गावांमध्ये à¤¶à¥‡à¤–र पाचुंदकर यांचे मोठं वलय आहे&period; गेल्या वर्षी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर पाचुंदकर हे आंबेगावचे तालुकाध्यक्ष झाले होते&period; मात्र वर्षभरातच त्यांनी शरद पवारांच्या पक्षाला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला आहे&period;<&sol;p>&NewLine;<div class&equals;"player&lowbar;prerender">&NewLine;<div data-slikeid&equals;"1xyqj559zo" data-youtubeid&equals;"">&NewLine;<div id&equals;"player&lowbar;prerender&lowbar;container&lowbar;1xyqj559zo" class&equals;"default-outer-player mobile embed">पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राहिलेले शेखर पाचुंदकर आणि रांजणगाव देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षा व माजी जिल्हा परिषद सदस्या स्वाती पाचुंदकर यांनी मुंबईतील भाजप मुख्यालयात अधिकृतपणे भारतीय जनता पक्षात प्रवेश केला&period; भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पडला&period; सर्वार्थाने सुसंस्कृत असणाऱ्या आमच्या तालुक्यात गेल्या काही वर्षांपासून गुंडगिरी आणि धाक दपटशाहीचा प्रभाव वाढला आहे&period; समाजातील सर्वच घटकांना या गुंडगिरीचा तिटकारा होऊ लागला आहे&period; या सगळ्या घटकांचा आवाज म्हणून आम्ही आज à¤­à¤¾à¤œà¤ªà¤®à¤§à¥à¤¯à¥‡ प्रवेश à¤•रत आहोत&period; असं म्हणत प्रवेशावेळी पाचुंदकर यांनी एकाच वेळी दिलीप वळसे पाटील आणि अमोल कोल्हे या दोघांवरही निशाणा साधला आहे&period; त्यामुळे पुणे जिल्ह्यात आता पुन्हा एकदा एका नव्या तालुक्यात भाजप विरुद्ध राष्ट्रवादी हा वाद पाहायला मिळू शकतो&period;<&sol;div>&NewLine;<div><&sol;div>&NewLine;<div>source &colon; maharashtra times<&sol;div>&NewLine;<&sol;div>&NewLine;<&sol;div>&NewLine;

Exit mobile version