Home Latest News भिक्खुसंघातर्फे दीक्षाभूमीवर बाबासाहेबांचा जयघोष

भिक्खुसंघातर्फे दीक्षाभूमीवर बाबासाहेबांचा जयघोष

0

<p><strong>&&num;8211&semi; भदंत ससाई यांच्या उपस्थितीत बुध्दवंदना<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>&&num;8211&semi; संविधान चौक&comma; विमानतळ परिसरात अभिवादन<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>नागपूर &colon;-<&sol;strong> करुणा&comma; समता आणि प्रज्ञेचा संदेश देणारी पवित्र दीक्षाभूमी पुन्हा एकदा मंगळवारी धम्ममय वातावरणात न्हाऊन निघाली&period; परमपूज्य डॉ&period; बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती&comma; दीक्षाभूमी आणि धम्मसेना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बुध्दवंदनेच्या भव्य सोहळ्यात अनुयायींनी सहभाग घेतला&period; स्मारक समितीचे अध्यक्ष तथा धम्मसेना नायक भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांच्या प्रमुख उपस्थितीत काशाय वस्त्रातील भिक्खु आणि भिक्खुनी संघ मंगळवारी सकाळी दीक्षाभूमीवर पोहोचला&period; तथागत गौतम बुध्द आणि महामानव डॉ&period; बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना भदंत ससाई यांनी पुष्पमाला अर्पण करून अभिवादन केले&period; त्यानंतर उपस्थित अनुयायांनी त्रिशरण आणि पंचशील ग्रहण करून बुध्द&comma; धम्म आणि संघ या त्रिरत्नांप्रती निष्ठा व्यक्त केली&period;<img class&equals;"alignnone size-medium wp-image-16871" src&equals;"https&colon;&sol;&sol;insidernewstoday&period;in&sol;wp-content&sol;uploads&sol;2025&sol;10&sol;IMG-20251015-WA0008&lowbar;1&lowbar;copy&lowbar;800x602-300x226&period;jpg" alt&equals;"" width&equals;"300" height&equals;"226" &sol;><&sol;p>&NewLine;<p>१४ ऑक्टोबर १९५६ रोजी याच पावन भूमीवर डॉ&period; बाबासाहेब आंबेडकर यांनी महास्थवीर चंद्रमणी यांच्या हस्ते त्रिशरण आणि पंचशील ग्रहण करून बौद्ध धर्म स्वीकारला होता&period; त्या ऐतिहासिक धम्मदीक्षेच्या स्मृतीने आजही ही भूमी तेजोमय आहे&period; दरवर्षी या दिवशी भदंत ससाई यांच्या उपस्थितीत आयोजित केली जाणारी बुध्दवंदना म्हणजे फक्त सामाजिक परिवर्तन&comma; समानता आणि बंधुत्वाचा जिवंत संदेश आहे&period; याप्रसंगी भंते नागसेन&comma; भंते धम्मविजय&comma; भंते नागानंद&comma; भंते नागवंश&comma; भंते महानागा&comma; भंते कश्यप&comma; भंते अश्वजित&comma; भंते बुध्दघोष&comma; भंते धम्मप्रकाश&comma; भंते संघ&comma; भंते शांतीनागा&comma; भंते धम्मशील&comma; भंते धम्मदीप तसेच भिक्खुनी कुंडलिका&comma; अनोमा&comma; चित्ताबोधी&comma; धम्मानंद&comma; सुमेधा&comma; बोधीआर्या&comma; सुपवासा&comma; करुणादीप&comma; शीलानंद आणि विशाखा यांनीही उपस्थित राहून धम्मकार्याची अखंड परंपरा पुढे नेली&period; तत्पूर्वी भिक्खुसंघाने इंदोरा बुद्धविहार येथील बाबासाहेबांच्या पुतळ्याला तसेच संविधान चौक आणि विमानतळ परिसरातील पूर्णाकृती पुतळ्यांना पुष्पमाला अर्पण करून अभिवादन केले&period; यावेळी नन्हा सवईथुल&comma; आशिष शेंडे&comma; अशोक गोवर्धन&comma; अविनाश सवईथुल&comma; आर्यन सवईथुल&comma; अथर्वा सवईथुल&comma; प्रवीण रंगारी&comma; अमोल मेश्राम आणि श्रेयश गेडाम यांनी मोलाचे सहकार्य केले&period; दीक्षाभूमीवरील हा सोहळा केवळ ऐतिहासिक स्मरण नव्हे&comma; तर समतेच्या&comma; प्रज्ञेच्या आणि मानवतेच्या वाटेवर चालण्याची प्रेरणादायी दिशा आहे&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version