spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

दहा दिवसानंतर पुन्हा ग्रा पं अरोली सरपंच पदावर माजी सरपंचा रोशनी प्रशांत भुरे रुजू

–  ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी अप्पर आयुक्त यांच्या अपात्रतेच्या आदेशाला दिली स्थगिती 

किशोर साहू, मौदा :- 7 जुलैला अरोली ग्रामपंचायत सदस्य अमोल कुबडे यांच्या तक्रारीवरून महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 39 (1 ) अंतर्गत अप्पर आयुक्त नागपूर विभाग यांनी सरपंचा रोशनी प्रशांत भुरे यांना अपात्र घोषित केले होते. सदर आदेशाच्या विरुद्ध रोशनी प्रशांत भुरे यांनी ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे,मंत्रालय, मुंबई यांच्या न्यायालयात महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 39 (3) अन्वये अपील दाखल केले होते.

सदर प्रकरणावर शुक्रवार (ता.17 जुलै) रोजी झालेल्या सुनावणीत मंत्री गोरे यांनी अपिलार्थी रोशनी प्रशांत भुरे यांची स्थगिती मिळण्याबाबतची विनंती मान्य करून अप्पर आयुक्त नागपूर विभाग यांच्या दिनांक 7 जुलै च्या मूळ आदेश पुढील सुनावणी पर्यंत तात्पुरती स्थगिती प्रदान केली आहे. त्यामुळे दहा दिवसाच्या प्रतीक्षेनंतर माजी सरपंचा रोशनी प्रशांत भुरे, ग्रामपंचायत अरोली सरपंच पदावर पुन्हा दुसऱ्यांदा रुजू झालेल्या आहेत. तसा लेखी आदेशही गट विकास अधिकारी पंचायत समिती मौदा यांनी भुरे यांना पाठविलेला आहे. तो आदेश सरपंच रोशनी प्रशांत भुरे यांचे पती तालुका शिवसेनाप्रमुख (रामटेक विधानसभा क्षेत्र) प्रशांत भुरे यांनी सोशल मीडियावर वायरल करताच त्यांच्या समर्थकांतर्फे त्यांच्यावर शुभेच्छांच्या वर्षाव होत आहे, तर भुरे यांच्या विरोधकांमध्ये स्मशान शांतता पसरलेली आहे.

Popular Articles