spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

लोकसहभागातून नागपूरसह जिल्ह्यात १० लक्ष वृक्षारोपणाचा “महासंकल्प”

– केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महापौर निता ठाकरे यांनी घेतला पुढाकार

नागपूर :- निरामय जीवन जगण्यासाठी पर्यावरणपूरक वातावरणाची आवश्यकता असून, वृक्षारोपणाची चळवळ लोकचळवळीचे स्वरुप लाभावे, यासाठी सर्वांनी आपले योगदान देण्याचे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

नागपूर महानगरपालिका, नागपूर सुधार प्रन्यास, नागपूर जिल्हाधिकारी कार्यालय, नागपूर जिल्हा परिषद आणि ग्रीन फाउंडेशन नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरण संवर्धनासाठी नागपूर शहर व जिल्ह्यात १० लक्ष वृक्ष लागवडीचा संकल्प करण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते.

कविवर्य सुरेश भट सभागृहात आयोजित बैठकीत मनपाच्या महापौर निता ठाकरे, आमदार कृष्णा खोपडे, मोहन मते, प्रवीण दटके, उपमहापौर लिला हाथीबेड, स्थायी समिती सभापती  शिवानी दाणी-वखरे, मनपा आयुक्त डॉ. विपीन, जिल्हा परिषद नागपूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, पोलीस अधीक्षक  हर्ष पोद्दार, उप वनसंरक्षक विनीता व्यास, माजी महापौर दयाशंकर तिवारी, माजी आमदार प्रा. अनिल सोले, मनपाचे अतिरिक्त आयुक्त अंकित,  मुरुगानंथम एम.,मिलिंद मेश्राम, रा.तू.म. नागपूर विद्यापीठाचे प्रकुलगुरु अखिलेश पेशवे ग्रीन फाउंडेशनचे डॉ. सतीश वटे, निशांत गांधी, पर्यावरण तज्ञ दिलीप चिंचमालातपुरे, डॉ. गारवे, डॉ. कलंत्री धनंजय बापट, एमआयएमचे शकील पटेल, मुस्लिम लिगचे असलम मुल्ला खान, उपेंद्र कोठेकर, नासुप्रचे अधीक्षक अभियंता भांडारकर, दै. तरुण भारतचे मुख्य संपादक शैलेश पांडे, माजी नगरसेविका प्रगती पाटील आदी उपस्थित होते.

यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पुढे म्हणाले की, सर्वांना शुद्ध आणि स्वच्छ हवा मिळण्यासाठी वृक्षारोपणाचा हा महासंकल्प आपण येत्या १ ते ३० ऑगस्ट दरम्यान राबविण्यात येणार असून, यादरम्यान लावण्यात आलेल्या वृक्षारोपणाद्वारे शहराचे हिरवे आच्छादनात कितपत वाढ झाली याची चाचपणी देखील केली जाणार आहे. वृक्षारोपणाच्या या महासंकाल्पात सर्व नगरसेवक, शाळा, महाविद्यालयाचे प्राचार्य, शिक्षकवृंद, पोलीस कर्मचारी यांनी देखील सक्रीय सहभाग नोंदविण्याचे आवाहन गडकरी यांनी केले.

महापौर निता ठाकरे यांनी सांगितले की, आजचा दिवस आपल्या नागपूर शहराच्या इतिहासात एका नव्या हरित क्रांतीची सुरुवात करणारा दिवस ठरणार आहे. आपले लाडके नागपूर ही केवळ महाराष्ट्राची उपराजधानी नाही, तर ते संपूर्ण देशातील एक आदर्श, सुंदर आणि पर्यावरणपूरक शहर बनावे, यासाठी आज आपण सर्वजण मिळून एक ऐतिहासिक पाऊल उचलत आहोत. याचा मला आनंद आहे. नागपूर महानगरपालिका क्षेत्रात पर्यावरण संवर्धनासाठी ‘५ लक्ष वृक्षारोपणाचा’ जो भव्य आणि महत्त्वाकांक्षी निर्धार आपण केला होता, आज त्या वृक्षारोपणाचा महासंकल्प सोहळा साजरा करताना मला मनापासून आनंद आणि अभिमान वाटत असल्याचे त्यांनी सांगितले.

माजी महापौर दयाशंकर तिवारी यांनी नागपूर महानगरपालिकातर्फे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेने मागच्या काही वर्षात पर्यावरण संरक्षणासाठी केले गेलेले कामाची माहिती सर्वांना दिली. त्यांनी सांगितले की पाणी, ध्वनी, वायू प्रदूषणासाठी निर्मूलन करण्यासाठी गडकरी जी संकल्पबद्ध आहे.

ग्रीन फाऊंडेशनचे प्रमुख डॉ. सतीश वटे म्हणले की, नागपूर शहर हिरवे करण्यासाठी वृक्षारोपणाची गरज आहे. मनपाच्या वृक्षारोपणाच्या अभियानासाठी ग्रीन फाउंडेशन तांत्रिक सहाय्य दिले जाईल. हे शहर सर्वात हिरवेगार शहर करण्याची गरज आहे. प्रदूषण नियंत्रणासाठी झाडांची लागवड आवश्यक आहे. याशिवाय मोईलकडून लोखंडी कठडे दिले जाणार आहे.

याप्रसंगी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि महापौर श्रीमती निता ठाकरे यांच्या हस्ते वन विभागाचे प्रधान मुख्य संरक्षक श्रीनिवास राव, वेस्टर्न कोल फील्ड चे महाप्रबंधक जॉन, मॉयल चे सी एम डी वी सुरेश यांच्या सत्कार करण्यात आला. या प्रत्येकी पाच लक्ष वृक्ष देण्याचे संकल्प केले आहे. तसेच रायसोनी ग्रुप, दिलीप चिंचमलतपुरे, प्रीतीश आंभरे यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला.

यावेळी पर्यावरण संवर्धनाची प्रतिज्ञा महापौर निता ठाकरे यांनी उपस्थितांना दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विष्णू चांगदे यांनी तर आभार जी गुरुप्रसाद यांनी व्यक्त केले.

हा महासंकल्प यशस्वी करण्यासाठी मनपा, नागपूर सुधार प्रन्यास, जिल्हा प्रशासन, डॉ. पंजाबराव देखमुख कृषी विद्यापीठ नागपूर, राज्य राखीव पोलीस दल (SRPF), केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF), वेस्टर्न कोल फिल्ड लि.(WCL) खनिज अन्वेषण आणि सल्लागार मर्या. (MECL), मगनीज ओर इंडिया लि. (MOIL), नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (NMRDA), सार्वजनिक बांधकाम विभाग, सामाजिक वनीकरण विभाग, महानगरपालिका नागपूर शाळा, महाविद्यालय, डॉक्टर असोसिएशन, कंत्राटदार असोसिएशन, इंडस्ट्रीज असोसिएशन, बिल्डर्स असोसिएशन, (CREDAI) हॉटेल्स व्यावसायिक असोसिएशन, गणपती मंडळ, दुर्गात्सव मंडळ, सामाजिक संस्था/NGO शासकीय कार्यालय, बँका आदी सहकार्य करणार आहेत


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.