तिरोडा :- तालुक्यातील 20 वर्षापासून बंद असलेली तिरोडा केसलवाडा तुमसर मार्गाची बस सेवा अखेर प्रहारच्या बेमुदत आमरण उपोषण केल्याने आज सुरू करण्यात आली. तिरोडा तालुक्यातील तिरोडा केसलवाडा तुमसर मार्गाची बस सेवा मागील वीस वर्षांपासून बंद होती.अशावेळी प्रहार तालुकाध्यक्ष प्रदिप निशाने यांनी 14 मागण्या धरुन बेमुदत आमरण उपोषण सतत पाच दिवस मुंडीकोटा बाजार चौकात केले होते. त्यात तिरोडा केसलवाडा तुमसर मार्गाची बस सेवा सुरु ही सुद्धा एक मागणी होती. त्यानी सतत पाच दिवस आमरण उपोषण केले त्यांच्याच कुठेतरी आंदोलनामुळेच आज बस सेवा परत सुरू करण्यात आली. दिंडी काढुन बसच्या चालकश्रीराम केशव इखार व वाहक रामकिशोर वरखडे स्वागत शाल श्रीफळ देऊन करण्यात आले. वीस वर्षांने बस सुरू झाल्याने केसलवाडा गावातील नागरिकांच्या चेहऱ्यावर हास्य उमटले आहे प्रहारचे महेंद्र भांडारकर जिला अध्यक्ष,वनिता भांडारकर पंचायत समिति सदस्य, वामन हजारे , वेदित बन्सोड ,विनोद काटवले , सुधीर गोमासे, अश्विन आदमने ,कार्यकर्ते सह दीपक कुकडे सरपंच केसलवाडा ,उत्तम कुकड़े सेवा सहकारी संस्था अध्यक्ष केसलवाडा, महेश कुकडे विनोद कुकडे ,राजु वाढवे बालू पडोळे निंबाजी कुकडे देवा कुकडे सह केसलवाडा परिसरातील नागरिक यावेळी उपस्थित होते.



