spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार विमान अपघात प्रकरणी – प्रफुल पटेल, सुनील तटकरे, आणि नरेश अरोरा यांची “नार्को टेस्ट “करण्याची मागणी बिगर सातबारा शेतकरी संघटनेची आक्रमक मागणी

नागपूर :- महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्व.अजित पवार यांचा २८ जानेवारी २०२६ रोजी झालेला विमान अपघात हा केवळ ‘दुर्दैवी अपघात’ नसून तो एक ‘नियोजित घातपात’ असल्याचा दाट संशय आता निर्माण झाला आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित म्हणून समोर येत असलेले प्रफुल पटेल, सुनील तटकरे आणि राजकीय सल्लागार नरेश अरोरा यांची तातडीने ‘नार्को टेस्ट’ (Narco Test) आणि ‘ब्रेन मॅपिंग’ (Brain Mapping) करण्यात यावी, अशी आक्रमक मागणी ‘बिगर सातबारा शेतकरी संघटनेचे प्रणेते जगदीश इंगळे यांनी केली आहे.

या संदर्भात संघटनेने केंद्रीय अन्वेषण विभागाला (CBI) सविस्तर निवेदन सादर करण्याचा निर्णय घेतला आहे. या मागणीमागील प्रमुख कारणे खालीलप्रमाणे आहेत:

१. कंत्राटाचा वाद की शेतकऱ्यांचे नाव ?: २७ जानेवारी २०२६ रोजी रात्री उशिरापर्यंत मंत्रालयात झालेल्या बैठकीत ३०० ते ४०० कोटींच्या कंत्राटावरून प्रफुल पटेल, सुनील तटकरे आणि नरेश अरोरा यांच्यात अजित दादांशी तीव्र वाद झाला होता. प्रफुल पटेल हे जाणीवपूर्वक हा वाद लपविण्यासाठी ‘धान उत्पादक शेतकऱ्यांच्या’ प्रश्नाचे नाव पुढे करून खोटी माहिती देत आहेत. जर हा प्रश्न खरोखरच शेतकऱ्यांचा होता, तर त्या बैठकीचा अधिकृत ‘अजेंडा’ किंवा ‘मिनिट्स’ कुठे आहेत ? असा सवाल भाई जगदीश इंगळे यांनी उपस्थित केला आहे.

२.नियोजित विलंबाचा कट:

त्या रात्री बैठकीत जाणूनबुजून वाद घालून अजित दादांना रस्ते प्रवासापासून रोखण्यात आले. शेवटच्या क्षणी त्यांना तांत्रिक बिघाड असलेल्या विमानाने प्रवास करण्यास भाग पाडले गेले, हे एका मोठ मोठेयेड्या यंत्र रचून अजित पवार यांच्या नियोजित घातपात करण्यासाठी व सत्यपाल येण्यासाठी खासदार प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे व नरेश अरोरा यांची ब्रेन मॅप नार्को टेस्ट करण्याची मागणी यावेळी पत्रकार परिषदेत बिगर सातबारा शेतकरी संघटनेचे प्रणेते भाई जगदीश इंगळे यांनी केली.

Popular Articles