Home Latest News डीएपीच्या पर्यायांचा वापर करावा; कृषी विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन

डीएपीच्या पर्यायांचा वापर करावा; कृषी विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन

0

<p><strong>&&num;8211&semi; जिल्ह्यात ९०६ मेट्रिक टन डीएपीचा पुरवठा&semi; लवकरच आणखी १&comma;२०० मेट्रिक टन उपलब्ध होणार<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>गडचिरोली &colon;-<&sol;strong> डीएपी खताच्या जागतिक पुरवठा साखळीवर परिणाम झाल्याने राज्यासह गडचिरोली जिल्ह्यातही डीएपी खताचा पुरवठा अपेक्षेप्रमाणे होत नसल्याने शेतकऱ्यांनी पिकांच्या गरजेनुसार पर्यायी खतांचा वापर करावा&comma; असे आवाहन जिल्हा परिषदेच्या जिल्हा कृषी विकास अधिकारी किरण खोमणे यांनी केले आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>जिल्ह्यात आतापर्यंत संरक्षित साठ्यासह ९०६ मेट्रिक टन डीएपी खताचा पुरवठा करण्यात आला असून&comma; पुढील काही दिवसांत आणखी १२०० मेट्रिक टन डीएपी खताचा साठा उपलब्ध होणार असल्याची माहितीही श्रीमती खोमणे यांनी दिली आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>सध्याची परिस्थिती लक्षात घेता शेतकऱ्यांनी केवळ डीएपीवर अवलंबून न राहता कृषी विभागाने शिफारस केलेल्या पर्यायी खतांचा वापर करून संतुलित खत व्यवस्थापन करावे&comma; असे आवाहन कृषी विभागाने केले आहे&period; डीएपीमध्ये १८ टक्के नत्र आणि ४६ टक्के स्फुरद असते&period; त्याऐवजी एनपीके १०&colon;२६&colon;२६&comma; एनपीके २०&colon;२०&colon;०&colon;१३&comma; एनपीके १२&colon;३२&colon;१६&comma; एनपीके १५&colon;१५&colon;१५ तसेच युरिया-एसएसपी कॉम्प्लेक्स यांसारख्या संयुक्त खतांचा वापर केल्यास पिकांना नत्र&comma; स्फुरद आणि पालाश ही तीनही प्रमुख अन्नद्रव्ये संतुलित प्रमाणात उपलब्ध होतात&period;<&sol;p>&NewLine;<p>कृषी विभागाच्या माहितीनुसार&comma; ट्रिपल सुपर फॉस्फेट &lpar;TSP&rpar; हेही डीएपीला प्रभावी पर्याय ठरू शकते&period; डीएपीच्या एका गोणीऐवजी अर्धी गोणी युरिया आणि एक गोणी टीएसपी वापरल्यास स्फुरदाची गरज प्रभावीपणे पूर्ण होऊ शकते&period; तसेच सिंगल सुपर फॉस्फेट &lpar;SSP&rpar; हे देशांतर्गत उत्पादित खत असून त्यामध्ये १६ टक्के स्फुरदासह सल्फर व इतर सूक्ष्म अन्नद्रव्ये असतात&period; विशेषतः सोयाबीन&comma; भुईमूग व सूर्यफूल यांसारख्या तेलबिया पिकांसाठी एसएसपीचा वापर अधिक लाभदायक असल्याचे कृषी तज्ज्ञांनी नमूद केले आहे&period; डीएपीच्या एका गोणीऐवजी अर्धी गोणी युरिया आणि तीन गोण्या एसएसपीचा वापर हाही एक चांगला पर्याय ठरू शकतो&period;<&sol;p>&NewLine;<p>कृषी विभागाने खतांच्या किमतींबाबतही शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे&period; अनुदानित युरियाची किंमत प्रति गोणी २६६&period;५० रुपये तर डीएपीची किंमत १&comma;३५० रुपये आहे&period; विविध कंपन्यांच्या संयुक्त खतांच्या किमती वेगवेगळ्या असून&comma; लोकप्रिय २०&colon;२०&colon;०&colon;१३ आणि १०&colon;२६&colon;२६ खतांच्या किमतीत मागील वर्षाच्या तुलनेत वाढ झाली आहे&period; ग्रॅन्युलर सिंगल सुपर फॉस्फेटची किंमत सुमारे ६५० रुपये&comma; तर झिंक बोरोन एसएसपीची किंमत सुमारे ८६० रुपये आहे&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>खत खरेदी करताना दक्षता घ्या<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>कृषी विभागाने शेतकऱ्यांना खत खरेदी करताना प्रत्येक गोणीवरील मुद्रित कमाल किरकोळ किंमत &lpar;MRP&rpar; तपासूनच खरेदी करण्याचे आवाहन केले आहे&period; पॉस मशीनवर नवीन दर दिसत असले तरी प्रत्यक्ष खताच्या गोणीवरील छापील किंमत पाहूनच खत खरेदी करावे&comma; असेही कृषी विभागाने स्पष्ट केले आहे&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version