किशोर साहू, मौदा, ता.४:- दरवर्षीप्रमाणे यंदाही नरसाळा येथील हनुमान मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमा निमित अखंड हरिनाम ज्ञानेश्वरी पारायण हरिपाठ , कीर्तन सप्ताह सोहळ्याला गुरुवार (दि. ३० ऑक्टोबर) ला सुरुवात झाली असून त्याच्या समारोप गुरुवार (दि. ६ नोव्हेंबर)ला होणार आहे.
मुक्काम रंगारी ,तालुका सौंसार येथील ह भ प चंद्रशेखर महाराज रोकडे, ज्ञानेश्वरी व्यासपीठ चालक ह, भ, प, चंद्रशेखर महाराज नरसाळा येथील ह भ प वंदना भोले ज्ञानेश्वरी व्यासपीठ चालक यांच्यामार्फत पहाटे ५ ते ६ काकडा भजन, ९ ते११ पारायण, पुन्हा दुपारी ३ते ५ पारायण, सायंकाळी ६ ते ७.३० पर्यंत माऊलीचा हरिपाठ, रात्री ८.३० ते १०.३० पर्यंत कीर्तन नंतर जागृती भजनाचा कार्यक्रम असा दैनंदिन कार्यक्रम सुरू आहे. नरसाळा येथील माऊली हरिपाठ महिला मंडळ हरिपाठ सुरू आहे.
मंगळवार (दि. ४ नोव्हेंबर)ला ह भ प हरिश्चंद्र महाराज वंजारी मु,काटोल यांचे कीर्तन .बुधवार( दि.५ नोव्हेंबर) ला ह भ प खुशाल महाराज वैद्य मु.वर्धा, यांचा रंगीत संगीत भारुडाचा कार्यक्रम गायक रवी महाराज सोनवणे , समीर महाराज घेर मृदंगाचार्य प्रज्वल महाराज वानखेडे यांच्या सहकार्याने पार पडेल.
गुरुवार (दि.६ नोव्हेंबर)ला सकाळी ७ वाजता मंदिरातून भव्य दिव्य माऊलीचा पालखी सोहळा निघेल . त्यामध्ये नरसाळा, कुंभापूर, कोपरा, तारसा, सावरगाव, नवेगाव या गावांचे भजन मंडळ दिंडी सोहळ्यात भाग घेतील. त्या नंतर १२ ते ३पर्यंत ह,भ, प, निंबाजी महाराज तागड मु. नागपूर यांचे गोपालकाल्याचे होईल व नंतर लगेच भव्य महाप्रसाद वितरण.
सप्ताहाच्या यशस्वीतेसाठी नरसाळा येथील गावकरी मंडळी गणपत चकोले ,प्रकाश पाटील ठाकरे, गजानन माहूर, विजय पाटील ठाकरे, ज्ञानेश्वर भोले, मोहन भोले, केशव ढोबळे, परसराम घारड, अशोक चकोले, राधेश्याम भोले, बंडू खंडाळे, रामभाऊ सराडकर, ज्ञानेश्वर ठाकरे, दिनेश भोले , महादेव भोले, अंकुश भोले, हिरो भोले, रामजी ठाकरे, नामदेव ठाकरे, डोमाजी ठाकरे , आदित्य माहूर , दिनेश चकोले, शंकर डहाके, मारुती डहाके, गंगाधर शेळके, बाळ्या शेळके, विष्णू शेळके, महादेव डहाके, सूर्यभान ठाकरे, वासुदेव ठाकरे, भावराव ठाकरे, भगवान ठाकरे, पुंडलिक चौधरी, विलास ठाकरे, हंसराज ठाकरे, बबन ठाकरे, राजकुमार वाक्कलकर, राजहंस ठाकरे, शुभम माहूरे, अशोक ब्राह्मणकर, महादेव शेळके, देवा घारड, हर्षु ठाकरे, जामन ठाकरे, पुरुषोत्तम सरोदे परिश्रम घेत आहेत.




