· 11 देशातील परिवहन मंत्री व वरिष्ठ अधिकऱ्यांची उपस्थिती
· नागपूर येथे 9 ते 12 जुलै रोजी आयोजन
· परिषदेच्या अयोजनाचे तयारी अंतिम टप्प्यात
नागपूर :- तिसऱ्या ब्रिक्स ट्रान्सपोर्ट वर्किग ग्रुपच्या आयोजनाचे जबाबदारी नागपूर शहराला मिळाली असून 4 दिवस चालणाऱ्या या महत्वपूर्ण आंतरराष्ट्रीय परिषदेत ब्रिक्स सदस्य राष्ट्रासह 11 देशातील परिवहन मंत्री परिषदेत सहभागी होणार आहेत. नागपूर येथे होणाऱ्या या परिषदेच्या आयोजनामुळे येथील पायाभूत सुविधा जागतिक पातळीवर पोहचविणे सुलभ होणार आहे. त्यामुळे या परिषदेचे आयोजन वैशिष्ट्यपूर्ण व्हावे. त्यादृष्टीने विभाग प्रमुखांनी परिषद यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांनी केले आहे.
विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात तिसऱ्या आंतरराष्ट्रीय ब्रिक्स परिषदेच्या आयोजनासाठीच्या पूर्वतयारीची बैठक विभागीय आयुक्त बिदरी यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आली होती. त्याप्रसंगी मार्गदर्शन करतांना त्या बोलत होत्या.
ब्रिक्स परिषदेच्या आयोजनाची तयारी अंतिम टप्प्यात असून केंद्र व राज्य शासनाची यंत्रणा परिषदेच्या आयोजनासाठी सज्ज असून या परिषदेच्या आयोजनामध्ये कोणतीही कमतरता राहू नये तसेच नागपूर शहराचा नावलौकीक वाढेल यादृष्टीने सर्व अधिकाऱ्यांनी काम करावे, असे निर्देश बिदरी यांनी यावेळी दिले.
यावेळी महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विपीन इटनकर, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती संजय मीणा, महानगरपालिकेचे अतिरीक्त आयुक्त एम. मुरगानाथन, विभागीय आयुक्त कार्यालयाचे अपर आयुक्त प्रदिप कुलकर्णी, भारतीय रस्ते प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक अभिजीत जिचकार, संतोष कुमार काटकर, एनएचआयेच प्रकल्प संचालक प्रविण बिजेवार, पोलीस उपायुक्त रमेश धुमाळ, स्वागत अधिकारी इंदिरा चौधरी आदि विभाग प्रमुख यावेळी उपस्थित होते.
तिसऱ्या ब्रिक्स परिषदेच्या आयोजनासाठी नागपूरची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे नागपूर शहराचा आंतरराष्ट्रीयस्तरावर लौकिक वाढेल तसेच जागतिकस्तरावर ओळख निर्माण होईल. त्यादृष्टीने या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करतांना आगमनापासून ते समारोपापर्यंत सर्व व्यवस्था सज्ज राहील. या परिषदेच्या आयोजनाची जबाबदारी एनएचआयकडे सोपविण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनतर्फे संपूर्ण जबाबदारी उच्च दर्जाची राहील. यासाठी दिलेली जबाबदारी यशस्वीपणे पूर्ण करावी अशा सूचना विभागीय आयुक्त बिदरी यांनी यावेळी केल्या. ब्रिक्स परिषद 9 जुलै 2026 पासून सुरू होणार आहे. त्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर संबंधित राष्ट्राचे परिवहन मंत्री तसेच प्रतिनिधी यांचे स्वागत तसेच निवासव्यवस्था, वैद्यकीय व्यवस्था, परिषदेच्या आयोजन हॉटेल रेडिसन ब्लू येथे होणार असल्यामूळे तेथील व्यवस्था तसेच शहरातील मुख्य रस्त्यांच्या सौंदर्यीकरणासोबतच स्वच्छतेवर विशेष लक्ष द्यावे अशा सूचना करतांना बिदरी म्हणाल्या की, एनएचआय, सार्वजनिक बांधकाम नागपूर महानगरपालिका, मेट्रो, पोलीस यंत्रणा आदींनी परषिदेच्या आयोजनाची पूर्वतयारी तसेच परिषदेच्या दरम्यान चार दिवस अभ्यागतांना गैरसोय होणार नाही. यादृष्टीने नोडल अधिकाऱ्यांची करावी. ब्रिक्स परिषदेचे सदस्य ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पांना भेट देत असल्यामूळे जिल्हाधिकारी व प्रकल्प संचालक यांनी संपूर्ण व्यवस्था करावी अशी सूचना विभागीय आयुक्त यांनी केली.
प्रारंभी अपर आयुक्त सामान्य प्रदिप कुलकर्णी यांनी प्रास्ताविकात ब्रिक्स परिषदेच्या आयोजनासंदर्भात माहिती दिली. आभार निर्मल झाडे यांनी मानले.




