– स्कॅनिंग कॅम्पमध्ये दुसऱ्या दिवशीही नागरिकांची उत्स्फूर्त गर्दी; १,५४७ जणांची मोफत आरोग्य तपासणी
नागपूर :- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्षातर्फे दक्षिण पश्चिम नागपूर, पश्चिम नागपूर आणि दक्षिण नागपूर विधानसभा क्षेत्रात आयोजित करण्यात आलेल्या महाआरोग्य शिबिराअंतर्गत सुरू असलेल्या स्कॅनिंग कॅम्पला दुसऱ्या दिवशीही नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. १५ जुलैपर्यंत तीनही विधानसभा क्षेत्रातील विविध केंद्रांवर हे स्कॅनिंग कॅम्प आयोजित करण्यात येत असून, त्यानंतर पात्र रुग्णांवर तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली विविध शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत करण्यात येणार आहेत.
दक्षिण पश्चिम आणि पश्चिम नागपूर विधानसभा क्षेत्रातील सात केंद्रांवर एकूण १,५४७ नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच २९६ आयुष्मान कार्ड आणि २९६ आभा कार्ड, अशा एकूण ५९२ कार्डांची नोंदणी करण्यात आली.

दक्षिण पश्चिम नागपूर विधानसभा क्षेत्रातील त्रिकोणी मैदान (एन.आय.टी. लेआऊट, अजनी), साईनगर समाज भवन (साईनगर), हनुमान मंदिर (गोपालनगर स्टेट बँक कॉलनी) आणि सुर्वेनगर समाज भवन येथे आयोजित स्कॅनिंग कॅम्पमध्ये १,००४ नागरिकांनी आरोग्य तपासणीचा लाभ घेतला. या केंद्रांवर १७९ आयुष्मान कार्ड व १७९ आभा कार्ड अशी एकूण ३५८ कार्डांची नोंदणी करण्यात आली.
पश्चिम नागपूर विधानसभा क्षेत्रातील नेहरू नगर कॉलनी (पोलिस लाइन टाकळी), जगदीश नगर समाजभवन (मकरधोकडा) आणि विवेकानंद समाज भवन (हजारी पहाड) येथे आयोजित स्कॅनिंग कॅम्पमध्ये ५४३ नागरिकांनी मोफत आरोग्य तपासणी करून घेतली. तसेच ११७ आयुष्मान कार्ड व ११७ आभा कार्ड अशी एकूण २३४ कार्डांची नोंदणी करण्यात आली.
महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याचा हा महत्त्वपूर्ण उपक्रम असून, १५ जुलैपर्यंत विविध केंद्रांवर स्कॅनिंग कॅम्प सुरू राहणार आहेत. जास्तीत जास्त नागरिकांनी या मोफत आरोग्य सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

७ जुलै रोजी येथे होणार स्कॅनिंग कॅम्प
📍 पश्चिम नागपूर
– हनुमान मंदिर, गवर्नमेंट प्रेस कॉलनी (दाभा)
– सिद्धरूढ हनुमान मंदिर (पंधराबोडी)
📍 दक्षिण पश्चिम नागपूर
– बुद्धविहार (जाट तरोडी नं. ३,)
– लक्ष्यवेध बहु उद्देशीय संस्था मैदान (नरेंद्र नगर)
– गणेश मंदिर (तात्या टोपे नगर, प्रताप नगर)
– दुर्गा मंदिर समाज भवन (सोनेगाव)
वेळ : सकाळी ८ ते दुपारी २




