spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

इराणसोबतच्या युद्धात अमेरिकेला सर्वात मोठा दणका

अमेरिका इराणविरोधात थेट मैदानात उतरली आहे. इस्त्रायल, इराण आणि अमेरिका यांच्यात मोठा संघर्ष पेटला. मोठे हल्ले केले जात आहेत. अमेरिका थेट या युद्धात उतरल्याने युद्ध अधिक घातक होताना दिसत आहे. अमेरिकेचे फायटर जेट मोठे हल्ले करत आहेत. इराणच्या कमांडर सेंटरवर भीषण हल्ला करण्यात आला. इराणमधील शाळेवर घातक हल्ला केला, ज्यात 170 मुलींचा जीव गेला. शाळांना टार्गेट केले जात आहे. कच्चा तेलाचा आयात आणि निर्यात दोन्ही जवळपास थांबले. इराणकडून अमेरिकेचे लष्कर तळ असलेल्या देशांमध्ये हल्ले केले जात आहेत. अमेरिकेने 14 देशांची एक यादी प्रसिद्ध करत आपल्या नागरिकांना कोणत्याही परिस्थितीमध्ये साैदी अरेबिया, कतार, कुवेत, इस्त्रायल, इराण, इराक, सीरिया यासारखे देश पुढील काही तासात सोडण्यास सांगितले आहेत. यामुळे अमेरिकेच्या डोक्यात काहीतरी भयंकर असल्याचे स्पष्ट होतंय. इराणकडूनही थेट अमेरिकेच्या दूतावास कार्यालयांना टार्गेट केले जात आहे .

यादरम्यानच आता इराणने अमेरिकेला मोठा दणका दिला. इराणकडून दुबईतील तब्बल 2 अमेरिकन दूतावास कार्यालयांना टार्गेट करत मोठा हल्ला करण्यात आला. ड्रोन हल्ला करण्यात आला. या हल्ल्यानंतर दूतावासाला आग लागली. हा अमेरिकेसाठी मोठा धक्का असल्याचेही सांगितले जात आहे. अनेक देशात सध्याच्या घडीला अमेरिकन दूतावाला टार्गेट केले जात आहे.

त्यामध्येच दुबईत अमेरिकन दूतावासावर थेट ड्रोन हल्ला करण्यात आला. या हल्ल्याचे काही फोटो आणि व्हिडीओही पुढे आली. दुबईत फक्त अमेरिकन दूतावासच नाही तर विविध भागात हल्ले केले जात आहेत. लोकांना पूर्वी दुबई अत्यंत सुरक्षित वाटत. मात्र, ज्यापद्धतीने सध्या दुबईमध्ये स्थिती आहे ती अत्यंत गंभीर आणि बिकट आहे.

दुबई विमानतळावरही हल्ला करण्यात आला. अनेक लोक दुबईमध्ये अडकून पडले आहेत. लोकांनी घराबाहेर पडू नये, अशा सूचना देखील दिल्या जात आहेत. आता इराणने केलेल्या दूतावासावरील हल्ल्या बदला अमेरिका नक्की कसा घेते हे पाहण्यासारखे ठरणार आहे. हे युद्ध पेटताना दिसत असून या युद्धात अनेक देश हे भरडले जात असल्याचेही बघायला मिळत आहे.

Popular Articles