spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

खाडीतील युद्धामुळे तेल संकट, अशा कठीण प्रसंगात भारताच्या मदतीसाठी हा देश पहिला धावून आला

अमेरिका-इस्रायलने इराणवर हल्ला केल्यानंतर प्रत्युत्तराची कारवाई करताना इराणने सगळ्या पश्चिम आशियाला युद्धामध्ये ओढलं. या युद्धाचा तेल पुरवठ्यावर आणि तेलाच्या किंमतींवर परिणाम होणार आहे. भारताकडे आता 74 दिवसांचा क्रूड ऑईल आणि रिफाइंड ऑईलचा स्टॉक आहे. अशावेळी रशिया पुन्हा एकदा भारताच्या मदतीसाठी पुढे आला आहे. आखाती देशांमधील संकटांमुळे जागतिक तेल पुरवठा बाधित झाला तर भारताला तेल पुरवठ्यात सहकार्य करायला तयार आहोत असे संकेत रशियाने दिल्याचे रॉयटर्सने आपल्या वृत्तात म्हटलं आहे. पश्चिम आशियातील वाढत्या तणावामुळे ऊर्जा बाजार अस्थिर झालेला असताना मदतीचा हा प्रस्ताव आला आहे. स्ट्रेट ऑफ होर्मुजच्या माध्यमातून होणार्‍या तेल पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. इराणने स्ट्रेट ऑफ होर्मुज बंद केलाय. स्ट्रेट ऑफ होर्मुज हा जागतिक तेल आणि गॅस व्यापाराचा एक महत्वाचा सागरी मार्ग आहे.

भारताकडे सध्या पुरेशा प्रमाणात कच्च तेलं आणि इंधनाचा साठा आहे हे भारत सरकारने मंगळवारी स्पष्ट केलं. त्यामुळे पुढचे काही दिवस तरी या युद्धाचा परिणाम होणार नाही. भारताचं जवळपास निम्मं कच्च तेलं आणि एलपीजीची आयात स्ट्रेट ऑफ होर्मुजच्या मार्गावरुन होते. अमेरिका-इस्रायलने इराणच्या ठिकाणांवर हल्ले केल्यानंतर या मार्गावरुन जाणाऱ्या व्यापारी जहाजांवर हल्ल्याचं संकट आहे. कारण इराणने स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

भारताकडे सध्या कच्च तेलं आणि रिफाइंड पेट्रोलियम उत्पादनांचा एकूण 74 दिवसांचा साठा आहे. पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अधिकारी कच्चं तेलं, एलपीजी आणि एलएनजीच्या आयातीसाठी पर्यायी देशांचा शोध घेत आहेत. भारताकडे पेट्रोल, डिझेलसह अन्य इंधनांची देशांतर्गत मागणी पूर्ण करण्यासाठी सहा ते आठ आठवड्याचं पर्याप्त कच्च तेलं आणि पेट्रोलियम उत्पादनाचे साठे आहेत. सध्याच्या भूराजकीय परिस्थितीत पुरवठा बाधित झाला, तर त्याचा सामना करण्यासाठी भारत पूर्णपणे सज्ज आहे असं पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी सांगितलं. भारत जगातील तिसरा मोठा कच्चं तेल आयात करणारा देश आहे. रिफायनिंग क्षमतेमध्ये चौथ्या स्थानावर आहे. पेट्रोलियम उत्पादन आणि निर्यातीत पाचव्या स्थानावर आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.