नागपूर :- राष्ट्रवादी माथाडी व जनरल कामगार युनियनच्या नागपूर जिल्हा अध्यक्षपदी अमित अंबादे यांची नियुक्ती करण्यात आली. राष्ट्रवादी माथाडी व जनरल कामगार यूनियन महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष उमेश पाटील यांच्या उपस्थितीत हॉटेल रेडिसन ब्ल्यू येथे विदर्भ प्रदेश अध्यक्ष वर्षा शामकुळे यांनी या नियुक्तीची घोषणा केली. या नेमणुकीमध्ये विदर्भ प्रदेश सचिव गुरुमुखसिंग बावरा, वर्धा जिल्हा अध्यक्ष महेंद्र शिरोडे, सुधीर रणशूर व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
उमेश पाटील यांच्या हस्ते नवनियुक्त नागपूर जिल्हा अध्यक्ष यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. सर्व पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी नवनियुक्त जिल्हाध्यक्ष अमित अंबादे यांचे अभिनंदन केले.
ही माथाडी संघटना कामगारांसाठी काम करणारी असून राज्यभरातील जिल्ह्यात शाखा असल्याची माहिती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष उमेश दादा पाटील यांनी पदाधिकाऱ्यांनी दिली. यावेळी दीक्षित मेश्राम, शुभम करवाडे, पूनम अंबादे, जुगराजसिंग बोपराई, पंमासिंग बोपराई, नितीन श्रीवास्तव, सामाजिक कार्यकर्ते अज्जु भाई पठाण, इर्शाद खान, निखिल निनावे, आलोक मेंढे, शार्दुल पाटील, रवी झाकरेल, सागर कारळे, प्रतीक पाटील, अंकित शाहू, रीतीक पेंडले, रिषभ नेवले, अनिकेत अंबादे, प्रियांशु अंबादे, वैभव कोचे, शिलास भैसारे, क्रिश अंबादे, निर्भय सांगोडे, सम्यक सांगोडे, तन्मय रहाटे आदी कार्यकर्ते व नेते मंडळी उपस्थित होते.




