Home Latest News विद्युत बिलाचे भरावे लागतात 10 रुपये अतिरिक्त शुल्क

विद्युत बिलाचे भरावे लागतात 10 रुपये अतिरिक्त शुल्क

0
60

– तारखेच्या नंतर येतो बिल

तिरोडा :- महावितरण महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित विद्युत बिल प्रत्येक महिन्याला विद्युत ग्राहकाला येत असते परंतु हेच विद्युत बिल ग्राहकाला दिलेल्या तारखेच्या नंतर मिळत असेल तर ग्राहकाला अतिरिक्त दहा रुपये द्यावे लागत असल्याच्या प्रकार मुंडीकोटा परिसरातील घोगरा गावात दिसून येत आहे मागील दोन महिन्यापासून विद्युत बिल विद्युत बिरबल दिलेल्या तारखेच्या नंतर येत असल्याने विद्युत ग्राहकाला दहा रुपये अतिरिक्ष शुल्क देऊन भरावे लागत असल्याचा धक्कादायक प्रकार दिसून येत आहे एकीकडे विद्युत महावितरण द्वारा विद्युत बिलचे दर वाढल्यामुळे विद्युत ग्राहकाला ग्राहक कसेबसे विद्युत विहीर प्रत्येक महिन्याला भरत असतो त्यातच जर विद्युत बिल तारखेच्या नंतर येत असतील तर दहा रुपयाच्या उदंड विद्युत ग्राहकाला बसत असतो यामुळे महावितणच्या घोगरा गावातील विद्युत लाईमेन लेंढे यांना विद्युत बिला विषयी माहिती विचारले असता त्यांनी ज्युनियर इंजिनियर वडेगाव सुधाकर कावडे यांना विचारा असे सांगितले .यावर कावडे यांना विचारले असता त्यांनी सांगितले विद्युत बिल वितरणाचे काम एका एजेन्सी असून विद्युत बिल चे काम ही एजन्सी पाहत असते त्यामुळे हे बिल कुठेतरी एजन्सीच्या चुकीमुळे वेळेवर येत नसल्याचे त्यांनी सांगितले* याकडे सबंधित महावितरणच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन संबंधित एजन्सीवर योग्य ती कारवाई करून अतिरिक्त दहा रुपयाच्या शुल्काच्या विद्युत ग्राहकाला द्यावे लागत आहे त्याकरता त्या एजन्सीवर कारवाई करावी अशी मागणी घोगरा परिसराती नागरिकांनी केली आहे. यावर आता महावितरण संबंधित एजन्सीवर कोणती कारवाई करते हे पहावे मिळेल.