Home Latest News नवीन GST सुधारणा विधेयक : देशाच्या विकासाला नवीन दिशा व सर्वसामान्यांना मोठा...

नवीन GST सुधारणा विधेयक : देशाच्या विकासाला नवीन दिशा व सर्वसामान्यांना मोठा दिलासा

0
67

– केंद्र सरकार व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाजप जिल्हाध्यक्ष- नागपूर (ग्रा.) आनंदराव राउत यांनी मानले आभार:

– 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या दरम्यान सेवा पंधरवाडा अभियान कार्यक्रम

केंद्र सरकारने नुकतेच नवीन GST सुधारणा विधेयक मंजूर केले. खऱ्या अर्थाने हि देशाच्या अर्थव्यवस्थेला व सर्वसामान्यांना दिलासा देणारा कांतिकारी निर्णय ठरणार आहे. २०१७ मध्ये केंद्र सरकारने GST करप्रणाली देशात लागू केली होती. त्यावेळी GST मध्ये ५%, १२%, १८% आणि २८% असे ४ स्लॅब ठेवण्यात आले होते. सरकारने वस्तू व सेवा कर (GST) च्या स्लॅब मधील १२% आणि २८% हे स्लॅब कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. आता अधिकांश वस्तूंसाठी केवळ ५% आणि १८% अशा दोन स्लॅब असतील. आता नवीन करप्रणाली मुळे वस्तू व सेवांमध्ये वर्गीकरण करणे सोपे होईल. २०१७ मध्ये लागू झालेला जीएसटी हा धाडसी पण गुंतागुंतीचा टप्पा होता. या दुसऱ्या टप्प्यातील सुधारणा ही आवश्यक कोर्स करेक्शन ठरेल हे निश्चित, जो भारताच्या अर्थव्यवस्थेला नव्या उंचीवर नेईल. ही सुधारणा केवळ कर- सुलभीकरणापुरती मर्यादित न राहता भारताची जागतिक स्पर्धात्मकता वाढविणारी ठरेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंजूर केलेल्या नवीन जीएसटी सुधारणांच्या अनुषंगाने होणारे परिणाम हे सर्वसामान्यांना आर्थिक संजीवनीच ठरेल हे नक्की.

नवीन जीएसटी सुधारणा शेतकऱ्यांसाठी आणि सर्वसामान्य जनतेसाठी अनेक प्रकारे फायदेशीर ठरणार आहेत. दैनंदिन जीवनात लागणाऱ्या अनेक वस्तूंवरील करदर कमी झाल्यामुळे स्वयंपाक घरातील खर्च कमी होईल. तूप, पनीर, दुग्ध पदार्थ, साबण, शॅम्पू यांसारख्या – आवश्यक वस्तू आता अधिक स्वस्त मिळणार असल्याने सर्वसामान्यांच्या जगण्याचा भार हलका होईल. शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणाऱ्या काही साहित्य व उपकरणांवरील जीएसटी कमी झाल्यामुळे त्यांचा खर्च कमी होईल. यामुळे त्यांचा उत्पादन खर्च कमी होऊन नफा वाढण्याची संधी उपलब्ध होईल. वस्तू स्वस्त झाल्यामुळे बाजारात मागणी वाढेल आणि विक्रीत वाढ होऊन शेतीमालालाही चांगली किंमत मिळण्याची शक्यता आहे. या सुधारणा ग्रामीण तसेच शहरी भागातील लोकांच्या खिशाला दिलासा देणाऱ्या ठरत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य शेतकरी शेतमजूर व मध्यमवगीय लोकांचे अर्थमंत्री निर्मला सीतारमण, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व केंद्र सरकार वर विश्वास अजून ठाम झाले आहे. आनंदराव राउत भाजप जिल्हाध्यक्ष नागपूर ग्रा. (रामटेक) अनिल निधान भाजप महामंत्री नागपूर ग्रा. (रामटेक) राहुल किरपान भाजप महामंत्री नागपूर ग्रा. (रामटेक) रिंकेश चवरे शुभांगी गायधने भाजप महामंत्री नागपूर ग्रा. (रामटेक) भाजप महामंत्री नागपूर ग्रा.(रामटेक) आनंदराव ठवरे, हरीश कंगाली डॉ. मुकेश मुदगर आणि डॉ. प्रीती मानमोडे यांची पत्रपरिषदेत उपस्थिती होती.