spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

दिवाळी निमित्त अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना दोन हजार रुपये भाऊबीज भेट – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

मुंबई :- अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना दोन हजार रुपये भाऊबीज म्हणून भेट देणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.

एकात्मिक बाल विकास सेवा (ICDS) योजनेअंतर्गत कार्यरत अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना भाऊबीज भेट म्हणून देण्यात येणार आहे. यासाठी एकूण ₹४०.६१ कोटींचा निधी उपलब्ध करून दिला असल्याची माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.

अंगणवाडी सेविका व मदतनीस या महिला व बालकांच्या संगोपनासाठी, पोषणासाठी आणि सर्वांगीण विकासासाठी महत्वाची सेवा बजावत आहेत. त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी ही भाऊबीजीची रक्कम भेट स्वरूपात मंजूर केली आहे. प्रत्येक अंगणवाडी सेविका व मदतनीस ही आपल्या समाजातील खरी ‘शक्ती’ असून, त्यांचा सण आनंदी व्हावा हीच आमची भूमिका आहे, असेही त्यांनी सांगितले.

भाऊबीज भेट रक्कम लवकरच अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना वितरित करण्यात येईल. या निर्णयामुळे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या दिवाळीचा आनंद अधिक उजळून निघेल असा विश्वासही मंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्त केला.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.